Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

ऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा देऊन क्लार्कची नोकरी करावी – दरेकर

उस्मानाबाद/ सुधीर पवार

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील विज वीज ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज बिल मोफत देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकांकडे पैसे नसताना विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना विजेची जास्तीची बिले देऊन जनतेला शॉक देण्याचे काम केले आहे. अशा काळात जनतेला दिलासा देण्याचे काम सरकारने करणे आवश्यक असताना उलटपक्षी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तसेच जास्तीची बीले मी तपासून देतो असे  म्हणणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपली जबाबदारी काय ? हे ओळखून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्यावा, मंत्री कशासाठी आहोत याचा विचार करावा ? बिले तपासण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाऊन बसावे. परंतु ते काम  करण्यासाठी त्यांनी प्रथम आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यानंतर महावितरण कंपनीच्या कार्यालयात क्लार्कची नोकरी करावी त्यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बिले  आपल्याकडे तपासणीसाठी घेऊन येतील.  त्यावेळी आपण बील तपासणीचे काम करावे असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि. २१ नोव्हेंबर रोजी राऊत यांना लगावला. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून भाजप, रिपाइं व रासप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड, सुधीर पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे व जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सुरू केला आहे. या मतदारसंघात पक्षाने अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली असून महाआघाडीचे सतीश चव्हाण यांना मतदारांनी दोन वेळा संधी दिली असून बारा वर्षातील सात वर्ष त्यांची सत्तेतील कारकीर्द होती. मात्र त्यांनी पदवीधरांचा एकही प्रश्न सोडविलेला नाही किंवा काम केलेले नाही. त्यांनी नात्यागोत्याचे राजकारण करीत निवडणुका जिंकल्या आहेत असा थेट आरोपही केला. विशेष म्हणजे इतर पदवीधर आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी समस्या देखील सभाग्रहात मांडल्या. परंतू चव्हाण यांनी आपल्याला अभिमान वाटेल अशी एक ही ही कामगिरी केली नसल्यामुळे त्यांची बारा वर्षाची कारकीर्द निष्क्रिय गेली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक गड असून पुन्हा एकदा बोराळकर रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला. तसेच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली नाही, कर्मचाऱ्यांना पगार नाही त्यामुळे सगळीकडे नैराश्य पसरले असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला गतीशील विकास दाखविला होता. त्यासाठी वाटर ग्रीडची योजना मंजूर देखील केली आहे. मात्र या सरकारचा जनतेशी व मंत्र्याशी देखील विसंवाद असल्यामुळे जनता प्रचंड नाराज असून या निवडणुकीच्या माध्यमातून सरकार विरोधात आपला राग व्यक्त करून दाखविल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close