Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

30 वर्षानंतर निवडणूक; पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारमध्ये असा लागला निकाल!


अहमदनगर : राज्यालाच नाही तर सगळ्या देशाला दिशादर्शक असणार आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये 30 वर्षांनी निवडणुक झाली. त्यामुळे या गावच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागुन होतं.
30 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत ‘विकास पुरूष’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पोपटराव पवारांनी एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाल्याची माहिती आहे.अहमदनगर- जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून ख्याती असलेल्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ३० वर्षांनंतर या गावात यंदा ग्रामपंचायत निवडणूक झाली. गावाला घडवणाऱ्या पोपटराव पवारांवरच ग्रामस्थांनी विश्वास दाखवला.
हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आदर्श ग्राम विकास पॅनलने किशोर साबले यांच्या परिवरत्न ग्रामविकास पॅनलचा धूळ चारली. आदर्श पॅनलचे विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, सुरेखा पादीर, मीना गुंजाळ, रंजना पवार, रोहिदास पादिर आणि पोपटराव पवार हे सर्वजण विजयी झाले आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close