Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर



मुंबई /प्रतिनिधी
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर लगेचच राज्यात पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी  टस्सल पाहायला मिळणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.कोरोना संसर्गाचा  प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत.राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. या सर्व ठिकाणी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.केंद्रीय सरकारने बनवलेले कृषी कायदे आणि मराठा आरक्षण स्थगिती या मुद्यावरून ग्रामपंचायत निवडणुकीत जनता कोणत्या बाजूने कौल देते ते पाहणे राजकीय दृष्ट्या महत्वाचे असणार आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सदर निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

पाहा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – १५ डिसेंबर २०२० (मंगळवार)
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – २३ डिसेंबर २०२० (बुधवार)
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०२० (बुधवार) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
उमेदवारी अर्जांची छाननी करण्याची तारीख आणि वेळ – ३१ डिसेंबर २०२० (गुरुवार) सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आणि वेळ – ४ जानेवारी २०२१ (सोमवार) दुपारी ३ वाजेपर्यंत
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख आणि वेळ – ४ जानेवारी २०२१ (सोमवार) दुपारी ३ वाजता
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२१ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) गडचिरोली जिल्ह्यासाठी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
मतमोजणीची तारीख – १८ जानेवारी २०२१ (सोमवार)
मार्च २०२० दरम्यान कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्याने मार्च २०२० मध्ये होणाऱ्या सुमारे १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (एप्रिल २०२० ते जून २०२० मध्ये मुदत संपलेल्या) आयोगाच्या आदेशान्वये स्थगित करण्यात आल्या होत्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close