Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

एकनाथ खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, 60 जण राष्ट्रवादीत दाखल.

जळगाव – माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता भाजपला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली आहे. आज जवळगावात भाजपच्या ६० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रावादीत प्रवेश केला आहे.

आता मी भाजपला ताकद दाखवून देतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केली. रावेर तालुक्यातील 60 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.

हौशे-गवशेच पक्ष सोडून जातील, गिरीश महाजनांनी लगावला टोला…
खडसेंकडून सुरु असलेल्या या पक्षबांधनीबाबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंना टोला लगावला. ते म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर कोणीही भाजप सोडून जाणार नाही. जे हौशे-गवशे असतील तेच पक्ष सोडून जातील. कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नाही, असे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close