Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

धुळीमुळे वाहनधारक त्रस्त समोरचा वाहन काहीच दिसेना’

केदारेश्वर कंपनीचा कर्मचारी झोपेत


फर्दापूर : अजहर शेख

 औरंगाबाद – जळगाव राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे . मात्र , याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे . औरंगाबाद – जळगाव राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून येथे रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे . तसेच फर्दापूर ( ता.सोयगाव ) येथील बसस्थानक , भारत पेट्रोलियम पंप मुख्यबसस्थानक ,परिसर ते अजिंठा घाटापर्यंत वाहन धारकांना दररोज वाहतूकीला कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या परिसरातील महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे . येथे काही ठिकाणी एका बाजूने सिमेंट महामार्ग बांधणीचे काम संथ गतीने सुरू आहे , तर दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोकळी सोडली आहे . दरम्यान एकेरी कच्च्या मार्गावर वाहनांची वर्दळ होत असल्याने महामार्गावर धुळीचे मोठमोठे लोट उठून या धुळीचा वाहनधारकांसह व बसस्थानक परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . हा परिसर २४ तास धुलीकणांनी व्यापला जात असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य घोक्यात आले आहे .केदारेश्वर कंपनी दररोज फक्त सकाळी एकच पाण्याचे टँकर द्वारे पाणी मारत असून नागरिक यांनी मागणी केली आहे .की दिवसातून ३ तीन वेळेस रोडवर पाणी मारण्यात यावे जेणेकरून उडणारी धूळ व वाहन चालवताना जनतेला त्रास कमी होईल . औरंगाबाद – जळगाव राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असून येथे रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे…

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close