Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

डॉ उन्मेष टाकळकर ह्यांना अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजि ( ACG ) ची फेलोशिप प्रदान

mh20live.com

मुंबई -सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चे चेयरमन व मॅनेजिंग डायरेक्टर तथा कॅन्सर शल्यचिकित्सक व पोट विकार तज्ञ डॉ उन्मेष टाकळकर ह्यांना अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजि ( ACG ) ह्या अमेरिकेतील तथा जागतिकस्तरावरील पोटविकार बाबत कार्य करणाऱ्या उच्च संस्थेची प्रतिष्ठेची फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे.ह्या पूर्वी डॉक्टर उन्मेष टाकळकर यांना अमेरिकन सोसायटी गॅस्ट्रोइंटेस्टीनल एंडोस्कोपी ( ASGE ) ह्या अमेरिकेतीलतथा जागतिक स्तरावरील संथेचीही फेलोशिप देण्यात आलेली आहे.अमेरिकेतील ACG व ASGE ह्या दोन्हीही पोटविकारावरील आधुनिक उपचार व त्या बाबतचे उच्च शिक्षण देणाऱ्यासंस्थांची अत्यंत मानाची समजली जाणारी फेलोशिप मिळवणारे डॉ उन्मेष टाकळकर हे मराठवाडा विभागातीलप्रथम तज्ञ डॉक्टर ठरले आहेत .डॉ टाकळकर यांचा पोटविकारावरील उपचाराचा प्रदीर्घ अनुभव , त्यामागची मेहनत , अधिकाधिक रुग्णांना देण्यातयेणारी उच्च दर्जाची तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व त्यातील सातत्य , पोट विकारावरील विविध राष्ट्रीय व आंतर-राष्ट्रीय परिषदांमधील त्यांची उपस्थिती व कार्य तसेच Gi -Vision ह्या प्रमुख पोटविकारावरील तसेच आधुनिकपोटाच्या शस्त्रक्रियेवरील परिषदेचे औरंगाबाद येथे आयोजन ह्या सर्व प्रमुख बाबींचा विचार करून हि मानाचीफेलोशिप डॉ टाकळकर यांना प्रदान करण्यात आलेली आहे .डॉ टाकळकर यांना जगप्रसिद्ध पोटविकार तज्ञ तथा Asian Institute of Gastroenterology , हैदराबाद चे प्रमुख ,पद्मभूषण डॉ डी नागेश्वर रेड्डी यांचे नियमित मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते . ACG व ASGE कडून मिळालेल्याह्या दोन्ही फेलोशिप साठी सुद्धा डॉ डी नागेश्वर रेड्डी ह्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.याच बरोबर अमेरिकेस्थित प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉक्टर नलिनी गुडा तसेच अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजि ( ACG ) चे पदसिद्ध प्रमुख डॉ महेश गोएनका व डॉ जोनाथन ए लेटन,सचिव ह्यांचे मोलाचेमार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे
डॉ टाकळकर ह्यांनी पोटविकारावरील आधुनिक उपचार व त्याकरीता लागणारे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान हे सर्वकाहीयुनायटेड सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपलब्ध केलेले असून सर्व रुग्णांना सवलतीच्या दारात ह्या सर्व वैद्यकीय उपलब्ध आहेत

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close