Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

आयसीटीई’च्या अभ्यासक्रम समितीवर डॉ.रत्नदीप देशमुख

औरंगाबाद, दि.२९ : अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषदेच्यामार्फत अखिल भारतीय माहिती-तंत्रज्ञान शिक्षण मंडळाच्या अंतर्गत अभ्यासक्रम रचना समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ.रत्नदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत एमसीए या तीन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करणे व नव्याने दोन वर्षाचा अखिल भारतीय स्तरावर प्रारुप आराखडा आणि तपशीलावर अभ्यासक्रम बनवण्यासाठी खालील सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीचे संयोजक डॉ.भारत भास्कर, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट रायपुर हे असणार आहेत. तसेच डॉ.सुदेष्णा सरकार, डॉ.मनिष अरोरा प्रा.कर्मेषु, प्रा.रविंद्र वैद्य, प्रा.पी.व्ही.सुरेश व प्रा.उज्वल लांजेवार, प्रा.डी.के.लोबियाल, प्रा.पी.एस.ग्रोवर व प्रा.एम.सुंदरसेन, प्रा.एस.सुरेश हे या समितीचे सदस्य आहेत.डॉ.रत्नदीप देशमुख हे संगणकशास्त्र विभागात प्राध्यापक असून विभागप्रमुख, अधिसभा, व्यवस्थापन परिषदेवर त्यांनी काम पाहिले आहे.संगणकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्या परिषद सदस्यपदी ते कार्यरत आहेत. डॉ.रत्नदीप देशमुख यांचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.राम चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close