Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती निमित्त मनसेच्या वतीने दिव्यांगाना धान्यकीट, सानेटायझर, मास्कचे वाटप

औरंगाबाद | महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उस्मानपुरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील गरजू दिव्यांगाना धान्य कीट, सानेटायझर, मास्कचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या हस्ते करण्यात आले. मनसेचे पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांच्या सहकार्याने या किटचे वाटप दिव्यांगाना करण्यात आले.

देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून तर १ मे दरम्यान संपूर्ण संचारबंदी करून १४४ कलम लागू केले आहेत. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन काम करणाऱ्या गोर गरीब दिव्यांगानवर उपासमारीची वेळ आली आहे. उत्पन्नाचे सर्वच स्त्रोत बंद असल्याने संचारबंदी काळात त्यांना आठ दिवस पुरेल अशा अन्नधान्य किटचे, सानेटायझर, मास्कचे वितरण मनसेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार सचिन अंभोरे, सचिन ठोकळ, संकेत काळे, राकेश भालेराव, राजू खरात, वसंत बनसोडे, अशोक मोरे, सुरेश गायकवाड यांची उपस्थिती होती. पुढील काळातही गोर, गरीब कामगारांना मनसेच्या वतीने मदत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मनसेचे पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांनी दिले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close