Dr. Karad
केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांचा शनिवारी ऑलिम्पिक संघटनेतर्फे गौरव
औरंगाबाद दि. ५ : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. अथलेटिक सिंथेटिक ट्रॅकच्या उभारणीसाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्या प्रित्यर्थ हा सोहळा शनिवारी (७ मे) आयोजित करण्यात आला आहे.
विभागीय क्रीडा संकुल येथे सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर सिंथेटिक ट्रॅक अंथरण्यासाठी सात कोटींचा निधी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने मंजूर केला आहे. यासाठी डॉ. कराड यांनी पाठपुरावा केला होता. या सत्कारप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. खेळाडू आणि शहरवासीयांनी कार्यक्रमाला हजेरी लावण्याचे आवाहन ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष बिजली देशमुख यांनी केले आहे.