तुम्ही जुनी गाडी वापरताय का? तुमची गाडी भंगारात जाणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय वाचा News

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना आज बजेट २०२१ सादर केलं. जुन्या गाड्या रस्त्यावरून हटवण्याकरता ‘स्क्रॅप पॉलिसी’ची घोषणा केली आहे. ‘क्लीन एअर’ चा विचार करता या पॉलिसी अंतर्गत २० वर्षांपूर्वीच्या खासगी गाड्या आणि १५ वर्षांपूर्वीच्या व्यावसायिक गाड्यांना ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरमध्ये जावं लागणार आहे.
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त
जुन्या गाड्या भंगारात जाणार
नुकतंच रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सरकारी वाहनांकरता १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅपमध्ये पाठवण्यास मंजुरी दिली आहे. मंत्रालयाच्या या निर्णयानुसार केंद्र, राज्य सरकार आणि पब्लिक सेक्टरच्या कंपन्यांनी वापरलेल्या १५ वर्षांच्या जुन्या गाड्या हटवाव्या लागतील. या पॉलिसीचं पालन एप्रिल २०२२पासून होणार आहे
हेही वाचाजालना :जिल्हा कोषागार कार्यालयात कोषागार दिन साजरा
One Comment