Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

धुळे जिल्ह्याचा 282 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न


धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या आज दुपारी झालेल्या बैठकीत धुळे जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2021- 2022 या आर्थिक वर्षाचा एकूण 281 कोटी 43 लाख रुपये खर्चाचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला.पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी नवीन नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा :मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्‌घाटन

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, खासदार डॉ. हिनाताई गावित, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार किशोर दराडे, आमदार काशिराम पावरा, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुख शाह, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, धुळे महानगरपालिका आयुक्त अजीज शेख, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर उपस्थित होते.
हेही वाचाGood News राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासून होणार सुरू


या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 147 कोटी 28 लाख रुपये खर्चाचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला. तसेच आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेचा 100 कोटी 75 लाख रुपये खर्चाचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला. याशिवाय अनुसूचित जाती उपयोजनेचा 30 कोटी 4 लाख रुपये खर्चाचा प्रारुप आराखडा यावेळी मंजूर करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, सन 2020- 2021 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर निधी 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करावा. आदिवासी भागातील वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 15 दिवसांत बैठका घेवून कार्यवाही करून अहवाल सादर करावा. तसेच ही गावे रस्त्यांनी जोडण्यासाठी सविस्तर अहवाल द्यावा. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1105 शाळा आहेत.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

त्यापैकी 900 शाळांमध्ये वीज जोडणी आहे. उर्वरित वीज जोडणीसाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी निधीची तरतूद जिल्हा परिषदेने करावी. तसेच वीज बिलसाठी या शाळांची वीज जोडणी खंडित करू नये. शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक साठी नियुक्ती करिता शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत.

हेही वाचाआरोग्यदायी तीळाचे फायदे काय आहे ,जाणुन घ्या…


धुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीतून अत्याधुनिक कॅमेरे बसवावेत. त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा. जिल्हा वार्षिक योजनेतून ट्रान्सफॉर्मर खरेदी करण्यात आले आहेत. या ट्रान्सफॉर्मरचे लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात यावे. तसेच आदिवासी भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गावनिहाय सर्वेक्षण करून अहवाल द्यावा,

अशाही सूचना पालकमंत्री श्री सत्तार यांनी दिल्या. धुळे जिल्ह्यात मुबलक जलसाठे उपलब्ध आहेत. तसेच या जिल्ह्यातील मासे चवीसाठी प्रसिध्द आहेत. मत्स्यव्यवसायातून रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने जलाशय निश्चित करून सविस्तर अहवाल सादर करावा. याबाबत लवकरच संबंधित मंत्री महोदयांकडे बैठक घेवून कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी श्री यादव यांनी पाठपुरावा करावा.  धुळे शहरातील वाहतूक नियोजनासाठी महानगरपालिका, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त पणे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा.याशिवाय धुळे जिल्ह्यातील पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, तलाव, मध्यम प्रकल्पाचे सर्वेक्षण करावे.

आवश्यक तेथील दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावेत. याबाबत जिल्हाधिकारी श्री यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घेवून अहवाल सादर करावा, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. रंधे, खासदार डॉ. गावित, आमदार श्री पटेल, आमदार श्री दराडे, आमदार श्री पावरा, आमदार श्री पाटील, आमदार श्री गावित, आमदार डॉ शाह यांनी भाग घेतला. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close