Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

तुम्ही ®टेस्ट चॅलेंज स्वीकारलं का – यंदाच्या उन्हाळ्यात स्लाईसचा® ग्राहकांना प्रश्न

तुम्ही ®टेस्ट चॅलेंज स्वीकारलं का – यंदाच्या उन्हाळ्यात स्लाईसचा® ग्राहकांना प्रश्न

कतरिना कैफसोबत ब्रँडची नवी जाहिरात सादर

 नव्या टीव्हीसीमधून स्लाईसची भारतातील सर्वाधिक स्वादिष्ट मँगो ड्रिंक ही ओळख अधिक बळकट 

नवी दिल्ली,  मार्च २०२१ : यंदाच्या उन्हाळ्यात बोल्ड स्टेटमेंटसह स्लाईस® ग्राहकांना ‘सबसे थिक सबसे टेस्टी’ चॅलेंज स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. भारतातील सर्वात दाट आणि सर्वात चविष्ट मँगो ड्रिंक ही त्यांची ओळख यातून अधिक दृढ केली जाणार आहे. या दाव्याला नेल्सनतर्फे करण्यात आलेल्या स्वतंत्र संशोधनाचा पुरावाही लाभला आहे. या सर्वेक्षणात आघडीचे मँगो ड्रिंक डोळे बंद करून चाखण्यास सांगण्यात आले होते आणि त्यात स्लाईसला® सर्वात दाट आणि चविष्ट ड्रिंक म्हणून नावाजण्यात आले. या सर्वेक्षणानुसार या ब्रँडने आपली ‘सबसे थिक सबसे टेस्टी’ मोहीम सादर केली आहे आणि त्यास ख्यातनाम अभिनेत्री आणि ब्रँड अॅम्बेसेडर कतरिना कैफच्या नव्या मजेशीर टीव्हीसीची जोड देण्यात आली आहे.

या नव्या जाहिरातीत सुंदर समुद्रकिनाऱ्याची पार्श्वभूमी आहे. यात ब्रँड अॅम्बेसेडर कतरिना कैफ एका चाहत्याला अल्टिमेट टेस्ट चॅलेंज देते आणि त्यातून स्लाईस® हे भारतातील सर्वात चविष्ट मँगो ड्रिंक असल्याचे स्पष्ट होते. कतरिनाने दिलेल्या या ब्लाइंड टेस्ट चॅलेंजमध्ये ती त्या चाहत्याला स्लाईस® आणि दुसरे एक आंब्याच्या चवीचे ड्रिंक यातून निवड करण्यास सांगते. या टेस्ट चॅलेंजच्या निकालामुळे स्लाईस® हेच भारतातील सर्वात दाट आणि चविष्ट मँगो ड्रिंक असल्याचे सिद्ध होते. कारण, या जाहिरातीतील सहकलाकार अखेर स्लाईसलाच® प्राधान्य देतो. जाहिरातीच्या शेवटी कतरिना ग्राहकांशी संवाद साधत त्यांनाही स्लाईस® टेस्ट चॅलेंज घेऊन त्यांनी स्वत: ‘सबसे थिक अॅण्ड टेस्टी‘ स्लाईस चाखून पाहावे, असे सांगते.

या नव्या जाहिरातीबद्दल पेप्सिको इंडियाचे ट्रॉपिकाना आणि स्लाईसचे असोसिएट डायरेक्टर अनुज गोएल म्हणाले, “ग्राहकांनी स्लाईसवर प्रचंड प्रेम केले आहे. आमच्या उत्पादनावर असलेला विश्वास यातून प्रतीत होतो. अर्थात, आम्हाला आणखी पुढे जात ग्राहकांना नवा सबसे थिक सबसे टेस्टी ब्लाइंड टेस्ट चॅलेंज स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. यामुळे भारतातील सर्वात दाट आणि चविष्ट मँगो ड्रिंक ही स्लाईसची ओळख अधिक दृढ होईल. अतुलनीय कतरिना कैफसोबत या मोहिमेच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास आम्ही उत्सुक आहोत.

या नव्या जाहिरातीबद्दल स्लाईसची ब्रँड अॅम्बेसेडर कतरिना कैफ म्हणाली, “स्लाईससोबतचे माझे नाते फार जुने आहे आणि स्लाईस हे भारतातील सर्वात चविष्ट मँगो ड्रिंक आहे हा माझा वैयक्तिक विश्वास मांडताना मला आनंद होतोय. ‘सबसे थिक सबसे टेस्टी’ ही नवी मोहीम सादर करण्यास मी प्रचंड उत्सुक आहे. यातून या ब्रँडवरचा माझा विश्वास दिसून येतो. माझे चाहते हे टेस्ट चॅलेंज स्वीकारून दाट आणि चविष्ट स्लाईस पिण्याचा अस्सल अनुभव मिळवतील, यासाठी मी उत्सुक आहे.

नव्या स्लाईस® टीव्हीसीला टीव्ही, डिजिटल, आऊटडोअर आणि सोशल मीडिया अशा ३६० अंश मोहिमेची जोड देण्यात येणार आहे. स्लाईस भारतातील सर्व आधुनिक आणि पारंपरिक रीटेल आऊटलेट्स, तसेच आघाडीच्या ई-कॉमर्स व्यासपीठांवर सिंगल आणि मल्टिपल सर्व्ह पॅक्समध्ये उपलब्ध आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close