Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा मा.आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद- मागील दहा-बारा दिवसांपासून मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आज दि.26 निवेदनाव्दारे केली आहे.

          मा.आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकर्‍यांना कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, तर कधी निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकर्‍यांना पडला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने अपेक्षेइतके उत्पन्न येईल असे वाटत असतानाच मागील दहा-बारा दिवसांपासून मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मूग, उडीद ही पिके ऐन काढणीच्या वेळेस पाऊस पडल्याने शेतातच मुगाला कोंब फुटल्याने ही पीके शेतकर्‍यांच्या हातातून गेली. त्यात अतिपावसामुळे आता कपाशी, सोयाबीन, मोसंबीच्या शेतात पाणी साचले आहे. तर उस, मका, बाजरीची पिके आडवी झाली असल्याचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकर्‍यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर चढलेला असताना हे अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून झालेल्या नुकसानपोटी शेतकर्‍यांना आर्थिक मदत करून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी मा.आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close