Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

दुनियादारी कार्यालयात धाडसी चोरी


जालना:
शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या दैनिक दुनियादारी कार्यालयात मंगळवारी मध्यरात्रीनंतर  चोरट्यांनी चॅनल गेटसह एका कॅबीनचे कुलूप तोडून धाडसी चोरी करुन पोलीस व माध्यमांसमोर एक नवे आव्हान उभे केले आहे. कार्यालयातील रात्रपाळीतील कर्मचारी रात्री आपले काम आटोपून मध्यरात्री बारा वाजता कार्यालयाला कुलूप लावून घरी गेल्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर कार्यालयातील संपादकांच्या कॅबीनचे लॉक तोडून आत प्रवेश केला. टेबलाची सर्व कप्पे धुंडाळून आतील शासकीय फाईल्स् अस्ताव्यस्तपणे फेकल्या तसेच काही फाईल्स् सोबत घेऊन गेले. कॅबीनमध्ये असलेला सॅमसग कंपनीचा अकरा हजार रुपये किंमतीचा एलसीडी टीव्ही नेला. विशेष म्हणजे चोरट्यांनी संगणक, प्रिंटर किंवा छपाई मशिनच्या कोणत्याही वस्तूला हात लावला नाही. कार्यालयात असलेल्या तीन कपाटापैकी एकाही कपाटाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा नेमका उद्देश काय असावा, याबद्दल दैनिकाचे कर्मचारी आणि खुद्द पोलीस अधिकारी संभ्रमात आहेत. उपसंपादक मधुकर मुळे यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि 461,  व 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय देशमुख यांनी आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यासह घटनास्थळी येऊन चोरीची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळी श्वान पथक, आणि ठसे तज्ञांना बोलावून बारकाईने पाहणी केल्यानंतर तपासासंदर्भात  संबंधितांना सूचना दिल्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close