Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची निवड

वडोद बाजार: औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा लेणी व्ह्यू पॉईंट येथे प्रजासत्ताक दिन निमित्त पत्रकार सेवा संघांची मराठवाडा स्तरिय स्नेह मिलन बैठक घेण्यात आली होती.

हेही वाचा साष्टपिंपळगावातील :मराठा उपोषण स्थगित केंद्राय आरक्षणा साठी :मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार


या बैठकीमध्ये मराठवाडा अध्यक्ष पदी सुनिल वैद्य व मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून आदर्श गावकरीचे पत्रकार दादासाहेब काळे यांची एकमताने निवड करण्यात आली . पत्रकार सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामनाथ जऱ्हाड सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.


.वाचा सविस्तर newsधक्कादायक: कन्नड – बेलखेडयांत दोनशे कोबंडयांचा अचानक मृत्यू

अजिंठा लेणी व्ह्यू पॉईंट येथे सर्व जिल्ह्यातील पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य नियुक्ती पत्र व ओळख पत्र वाटप करण्यात आले . यावेळी मराठवाडा अध्यक्ष सुनील वैध मराठवाडा उपाअध्यक्ष म्हणुन दादासाहेब काळे जिल्हा अध्यक्ष रविंद्र सुरडकर, अरुण चव्हाण, गणेश कोलते,नदीम शेख,इल्यास कुरेशी, प्रविन ढाकरे, शेख मुशर्रफ, सलीम कुरेशी,राजू दांडगे सर्व पदाधिकाऱ्यांची निवड या वेळी जाहिर करण्यात आली .


हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा
व मराठवाडा अध्यक्ष सुनील वैद्य तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रवींद्र सुरडकर यांनी व जिल्हा उपाध्यक्ष मोसिन शेख यांच्या शिफारशीनुसार नईम शहा यांना फुलब्री तालुका अध्यक्ष पदाचे ओळखपत्र देऊन निवड केली . दादासाहेब काळे याची यापूर्वी अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे .

अखिल भारतीय जिवा सेना संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष आहे . महाराष्ट्र नाभिक आरक्षण समितीचे ते प्रदेश उपाध्यक्ष तर नाभिक आरक्षण कृती समितीचे राज्य सचिव आहे . मराठवाडयाच्या विविध जिल्ह्यात विविध वृत्तपत्र व वृत्तवाहिनीसाठी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांची पत्रकार सेवा संघात पदाधिकारी म्हणून निवड करणे सुरू असून इच्छुक पत्रकारांनी ९४२२३५४८४४ या व्हॉट साप क्रमांकावर संर्पक करावा तर औरंगाबाद जिल्हयातील पत्रकार बांधवानी रविंद्र सुरडकर ७८७५८३७४४० या क्रमाकांवर संर्पक करावा व तालुक्यातील पत्रकारानी त्या त्या तालुकाध्याक्षांसी संर्पक करावाअसे आवाहन संघातर्फे सुनिल वैद्य यांनी यावेळी केले आहे .

हेही वाचा दोन दुचाक्यांचा समोरासमोर अपघात एक ठार दोन गंभीर भोकरदन मधील देहेड पाटीजवळील घटना

दादासाहेब काळे यांच्या निवडीनंतर पत्रकार बाबासाहेब सोनवणे , ज्ञानेश्वर चोपडे , गफ्फार भाई , बाबासाहेब ठोंबरे , सुरेश बोकील , सलिम शहा , भाऊसाहेब चोपडे , शंकर वाघ , अनिल राऊत , प्रकाश पायगव्हाण , नजमोद्दीन उमरावती आदि पत्रकारासह शिवाजी बन्सोड , दादाराव राऊत , सांडू घुले , विजय तोरणमल , इजियास भाई , गोरख दुधे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे . त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected]gmail.com MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close