Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

COVID-19: रुग्णांनी आहारात करा या घटकांचा समावेश

कोरोना महामारीमुळे देशातील परिस्थिती (Corona in India) अतिशय बिकट होत चालली आहे. कोरोनाबाधितांना दवाखाने कमी पडू लागल्यानं रुग्णांचा दवाखान्यांकडील लोंढा थांबवण्यासाठी केंद्र सरकार (Central gov of India) प्रयत्नशील आहे. बाधितांना रुग्णालयात भर्ती होण्याची वेळ येऊ नये, प्राथमिक टप्प्यात लोकांचा कोरोना नियंत्रणात यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेकडून आपला आहार कसा असावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्र सरकारने पाच वेगवेगळ्या प्रकारच्या आहारांचा समावेश असलेला दिवसाचा प्लॅन कोविड रुग्णांसाठी अमलात आणण्याचा सल्ला दिला आहे. शासनातर्फे ट्विटरवरून ही माहिती सर्वांसाठी शेअर करण्यात आली आहे. यात समाविष्ट असलेल्या पदार्थांमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास तसेच कोविड होऊन गेल्यानंतर येणाऱ्या थकव्यातून बरे होण्यास मदत होणार आहे.यामध्ये सांगितलेल्या आहारात न्याहारीमध्ये नाचणीचा डोसा किंवा एक छोटे भांडे भरून लापशीचा (porridge) समावेश करावा असे सांगितले आहे तर रात्रीच्या जेवणात खिचडी नक्की असावी असे म्हटले आहे.

  1. सकाळी सुरुवातीला भिजवलेले बदाम आणि मनुके खावेत. बदामामध्ये प्रथिने आणि मनुक्यांमध्ये लोहतत्त्व मोठ्या प्रमाणात असते.
  2. न्याहारीमध्ये नाचणीचा डोसा किंवा एक छोटे भांडे भरून लापशी किंवा ओट्सचा समावेश करावा.
  3. गूळ आणि तुपाचा आहारात समावेश करावा किंवा दुपारच्या जेवणानंतर ते खावे. दुपारच्या जेवणात पोळी किंवा भाकरी सोबत यांचा समावेश करता येईल.
  4. रात्रीच्या जेवणासाठी खिचडी करावी. यामध्ये सर्व प्रकारची पोषणमूल्ये असतात आणि पचायला हलकी असते. तसेच यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.
  5. त्यात महत्त्वाचे म्हणजे आहारात पातळ पदार्थांचा समावेश करावा. पाणी भरपूर प्यावे. घरी बनवलेले लिंबूसरबत, ताक दिवसभरात थोडे थोडे पीत राहावे.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close