Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन: ओमर अब्दुल्ला

नवी दिल्ली | समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाची लस ही भाजपची लस असल्याचं म्हटलं आहे. इतकच नाही तर आपण ही लस घेणार नसल्याचंही यादव म्हणाले आहेत. त्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही लस कुण्या पक्षाची नाही, आपण आनंदाने ही लस घेऊ, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत. ओमर अब्दुल्ला यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. आपण आनंदाने कोरोनाची लस घेणार आहोत. कारण ही लस कुण्या एका पक्षाची नाही तर मानवतेशी जोडली गेलेली आहे, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, अखिलेश यादव यांनी आपण ही लस घेणार नसल्याचं म्हटलं होतं. कारण ही लस भाजपशी निगडीत असल्यानं आपला त्यावर विश्वास नसल्याचं यादव म्हणाले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close