Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे कॅबिनेट मंत्री भुमरे यांच्या हस्ते पाचोड येथे शुभारंभ

१०० आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्रावर देण्यात येणार लस

पाचोड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण देशव्यापी अभियान हे 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यानंतर पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालय येथे कोविंड सेंटरमध्ये या लसीकरणाचा रोहीयो व फल उत्पादन कॅबिनेटमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले यावेळी पैठण उपविभागीय जिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, औरंगाबाद जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.जावेद अभर, वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय औरंगाबाद डॉ, महेश लड्डा डॉ, पल्लवी पगडाल, डॉ रेखा भंडारी डॉ वाघ ( MCH officer) , डॉ आगाज ( ता.आ अ पैठण ) वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर पोहरगावकर आदींच्या उपस्थितीत सर्वप्रथम डॉ. संदीप काळे, डॉ शिवाजी भोजने डॉ राहुल दवणे यांनी लस घेतली आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना कोरणा प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. लस घेण्यावरून अनेक सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने हीलस घेण्यास नागरिक नकार देत असल्याचं पाहायला मिळत असल्याने सरकारकडून 16 जानेवारी पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केल्यानंतर देशभरातील लसीकरण केंद्रावर या मोहिमेचा शुभारंभ रोहीयो व फल उत्पादन कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी ते बोलताना म्हणाले की खऱ्या अर्थाने कोरोना महामारी संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना हीलस देण्यात येत आहे तर आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांना लस दिल्याने जो काही समाजामध्ये नागरिकांमध्ये या लसी संदर्भात भीती निर्माण झालेल्या नागरिकांनाची भित दूर होइल आणि ते स्वतःहून ही लस घेण्यासाठी पुढे येथील असा विश्वास कॅबिनेट मंत्री भुमरे यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी राजु नाना भुमरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण. मा मा डॉ स्वप्नील माेरे, उपविभागीय अधिकारी पैठण/फुलंब्री, डॉ भुषण आगाज तालुका आरोग्य अधिकारी पैठण, डॉ रेखा भंडारी मॅडम,(adho) औरंगाबाद,डाॅ पगडाल मॅडम , डॉ पाेहेगावकर, अधिक्षक पाचाेड, डॉ निलकंठ चव्हाण, वैद्यकीय अधिकारी आडुळ, डॉ साेनकांबळे वैद्यकीय अधिकारी,विहामांडवा,डाॅ संदिप काळे, डॉ घुगे, डॉ भोजने, वैद्यकीय अधिकारी,श्री अनिल मगर ,तालुका पर्यवेक्षक पैठण,श्री शिवाजी शेडंगे तसेच कर्मचारी वृंद या कार्यक्रमास उपस्थित होत

जिल्ह्यात कुठेही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात भीती नाही : जिल्हाधिकारी चव्हाण

पैठण तालुक्यातील पाचोड येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. सुनील चव्हाण त्यांनी भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे यावेळी ते म्हणाले की जिल्हाभर यामध्ये कोरणा प्रतिबंधक लसीकरण केंद्र अंतर्गत प्रत्येक केंद्रावर शंभर आरोग्य कर्मचारी अधिकारी यांना ही लस देण्यात येत आहे कुठेही वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण असून ते स्वतः ही लस घेण्यास पुढे येत आहेत

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी डॉक्टर मध्ये उत्साह

पाचोड येथे कोरोना प्रतिबंधक लिसीकरण मोहीम केंद्राचा शुभारंभ केल्यानंतर शासकीय निमशासकीय व खाजगी आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून ही लस घेण्यासाठी मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे तर सर्वप्रथम हीलस घेणारे डॉक्टर संदीप काळे शिवाजी भोजने राहुल दवणे यांनी सांगितले की लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही अशक्तपणा जाणवत नाही किंवा आराम करण्याचीही गरज भासत नसून ही लस सर्वांनी घेण्यास काही हरकत नाही अशा प्रतिक्रिया माध्यमांना दिले आहेत

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close