Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

Birking news कोरोना ही लढाई आणि मास्क हीच आपली ढाल : उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसेच महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन लावणार की नाही याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. “नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळले नाही आणि संसर्गाचं प्रमाण असंच सुरु राहिल्यास आपल्याला राज्यात लॉकडाऊन करावा लागेल,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्रातील जनतेशी सवांद साधत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र हा आता पुन्हा कोरोना या महामारीशी सामना करत आहे .यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना ही लढाई आणि या लढाईमध्ये मास्क हीच आपली ढाल आहे. त्यामुळे कोरोनाचे संपूर्ण नियम आपणाला पाळावे लागणार आहेत. महाराष्ट्रात लसीकरण मोहीम चालू आहे आत पर्यंत ९ लाख लोकांना, कर्मचार्यांना लसीकरण करण्यात आलेले असल्याची माहिती यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close