Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादमध्ये आज लॉकडाऊनचा दुसरा दिवस; आज एकूण 267 नवीन रुग्णांची भर

जिल्ह्यात 4834 कोरोनामुक्त, 3032 रुग्णांवर उपचार सुरू


औरंगाबाद, दि. 11 (mh20live network) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 371 जणांना (मनपा 163, ग्रामीण 208) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 4834 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 267 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 200, ग्रामीण 67) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8216 झाली आहे. आजपर्यंत एकूण 350 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3032 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सायंकाळनंतर 73 रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 59 रुग्णांची अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*मनपा हद्दीतील रुग्ण : (51)*
हर्सुल कारागृह परिसर (3), नागेश्वरवाडी (10), एसआरपीएफ परिसर (1), अजब नगर (14), कैसर कॉलनी (1), हनुमान नगर (2), गजानन नगर (1), भवानी नगर (6), अरिहंत नगर (5), जयसिंगपुरा (1), कोकणवाडी (4), भगतसिंग नगर (3)
*चेक पॉइंटवरील रुग्ण (22)*
कांचनवाडी (8), हर्सुल (5), नगर नाका (2), दौलताबाद (1), चिकलठाणा (6)
*आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू*
घाटीमध्ये नऊ जुलै रोजी बायजीपुऱ्यातील 34 वर्षीय स्त्री, 10 जुलै रोजी लोटाकारंजातील 50 वर्षीय, 
11 जुलै रोजी दीपनगर, हडकोतील 80 वर्षीय, वाळूज परिसरातील श्रद्धा नगरमधील 50 वर्षीय, क्रांती चौकातील 69 वर्षीय, शहरातील विविध तीन खासगी रुग्णालयात मनजित नगरातील 73 वर्षीय, सुरेवाडीतील 52 वर्षीय, नवजीवन कॉलनीतील 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close