Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

कमी खर्चात बोर्डो पेस्टद्वारे बुरशीवर नियंत्रण कृषीपूत्र मयूर साळवे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर


औरंगाबाद – पारंपरिक शेतीतून शेतकरी वर्ग आता फळ पिकांकडे वळला आहे. परंतु, फळ झाडांवर पडणाऱ्या अनेक रोगांपैकी झाडावरील बुरशी रोगाने बागायतदारांचे मोठे नुकसान होते. बुरशी मुळे झाडांची फळ धारणा कमी होणे, रोगयुक्त फळ लागणे अशा अनेक प्रकारामुळे शेतकरी हैराण आहे. बुरशीजन्य रोगांपासून फळ झाडांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने येथील कृषी पूत्र मयूर संजय साळवे याने बोर्डो पेस्ट द्वारे बुरशी रोगांपासून फळ झाडांचे नुकसान थांबवता येथे याचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एमजीएमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मयूर साळवे आपल्या अभ्यासाचा लाभ शेतकऱ्यांना करून देण्यासाठी औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात प्रत्यक्ष शेतावर जावून शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट बाबत माहिती देत आहे. कॉपर सल्फेट, लाईम अर्थात कळीचा चुना, मोरचुर आणि पाणी याचे शास्त्रशुद्ध मिश्रण करून फळ झाडांच्या बुंध्याना खालून एक मीटरपर्यंत हे मिश्रण लावल्यास फळ झाडांवरील बुरशी रोगाचे नियंत्रण केले जावू शकते. याच सोबत शेती विषयक आधुनिक पद्धतींची माहिती त्या शेतावर जावून देत आहेत. निंबुवर्गीय फळ झाडांची जोपासना, खते व पेस्टीसाईड नियमन या बाबत मयूर साळवे शेतकऱ्यांना माहिती देत आहे. कमी खर्चात हे मिश्रण बनविले जावू शकते. शेतकऱ्यांनी याचा वापर करून आपली फळबाग रोग मुक्त ठेवावी असं आवाहन मयूरने केले आहे. या कामासाठी प्राचार्य एन.एम. म्हस्के, तज्ञ राम आगळे, तज्ञ विशाल कोहिरे पाटील याचे मार्गदर्शन लाभले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close