Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

लाडसावंगी ग्रा पं च्या उपसरपंचपदी काँग्रेसचे गणेश पवार यांची निवड

लाडसावंगी/रामहरी दाभाडे

औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक दि.२८/१/२०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली यामध्ये
काँग्रेस तर्फे गणेश प्रभाकर पवार व भाजपा तर्फे अनिल लक्ष्मण घायाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री केदारे, ग्रामविकास अधिकारी बी एस मुकाडे, व तलाठी आठवले यांनी सहकार्य केले. तरजनतेतून निवडून आलेले सरपंच सुदाम पवार यांचे अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.त्यानंतर मतदान घेण्यात आले.


वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख


गणेश पवार यांना ८ तर अनिल घायाळ यांना ७ मते मिळाले .
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. केदारे यांनी गणेश पवार यांना अनिल घायाळ यांचे पेक्षा १ मत जास्त मिळाल्यामुळे गणेश पवार यांना उपसरपंचपदी निवड झाली असल्याचे घोषित करण्यात आले.निवडी नंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करून विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.


.वाचा सविस्तर newsधक्कादायक: कन्नड – बेलखेडयांत दोनशे कोबंडयांचा अचानक मृत्यू
याप्रसंगी जि प चे माजी सभापती अंकुश शेळके, डॉ पंजाब पडुळ, केदार पडुळ, सुरेश शिंदे, अर्जुन शेळके, विष्णू खरपे,अय्युब कुरेशी,जगन्नाथ पडुळ, भगवान साळवे, अनिल भालेराव, प्रमोद भालेराव, फेरोज बागवान, सुनील हिवराळे,प्रमोद कोंडके, समी बागवान,नाना गाढे, लक्ष्मण चाळगे, राजू पडुळ, अंकुश नाईक, जफर बागवान, विठ्ठल पवार, सर्जेराव पवार, सदा पवार, सावता शिंदे,राऊप बागवान, विजय नवगिरे, युसूफ बागवान, आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचा सविस्तर news शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close