Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या: आ.संतोष पाटील दानवे

गारपीटीने नुकसान झालेल्या मालखेडा, ठालेवाडी, सुभानपुर व इब्राहिमपुर येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची आ.संतोष पाटील दानवे यांच्याकडुन पाहणी

भोकरदन /सुरेश गिराम
भोकरदन तालुक्यात गुरुवार दि.18/02/2021 रोजी दुपारी झालेल्या गारपीट व आवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी हंगामातील गहु, हरभरा, मका, ज्वारी, व कांदा या सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन त्यापासुन फलोत्पादक शेतकरीही सुटलेले नाही. रब्बी हंगामातील पिकांच्या बरोबरीनेच डाळींब व पपई सारख्या फळपिकांचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील मालखेडा, ठालेवाडी, सुभानपुर व इब्राहिमपुर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देवुन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी गटविकास अधिकारी उदयसिंग राजपुत यांच्यासह संबधित गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहाय्यक व कृषिमंडळ अधिकारी आवर्जुन उपस्थित होते.सदर पाहणीमध्ये कांदा सिड्सचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असुन सदर पिकासाठी शेतकऱ्यांनी खर्च केलेला एकरी 70 हजार रुपये खर्च वाया गेला असुन शेतकऱ्यांचे सरासरी एकरी 2 लक्ष 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे मत यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. तसेच गहु, हरभरा व रब्बी मका व ज्वारीचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले असुन हाता तोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याचे दुर्दैवी चित्र शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ट पंचनामे करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी शासनास तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना आ.संतोष पाटील दानवे यांनी दौऱ्यात सोबत असलेल्या अधिकारी यांना दिल्या आहेत. त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असेल अशा शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत झालेलया नुकसानीचे माहिती विमा कंपनीला तसेच तालुका कृषि अधिकारी भोकरदन यांना तातडीने कळविणे आवश्यक असुन त्यासाठी शेतकऱ्यांच्या सोयी करीता आमदार कार्यालयाकडुन एक सुटसुटीत फाॅर्म (फाॅर्मेट) शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच आजची शिवजयंती व शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवसीही तालुका कृषि कार्यालय भोकरदन येथे शेतकऱ्यांचे पिक विमा मागणीचे अर्ज स्विकारण्यासाठी व स्विकारलेल्या अर्जावर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी तालुका कृषि कार्यालय भोकरदन येथे आवश्यक ते अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश आ.संतोष पाटील दानवे यांनी तालुका कृषि अधिकारी श्री.भुते यांना दिले आहेत.दरम्यान गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यसरकारला धारेवर धरण्यासाठी प्रयत्न करनार असुन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल न होता धीर धरावा असे आवाहनही आ.संतोष पाटील दानवे यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले. यावेळी माजी सभापती भानुदास सरोदे, खरेदी विक्री संघाचे सभापती गणेश पा.ठाले, भाजयुमो तालुका अध्यक्ष दिपक पा.जाधव, पं.स.सदस्य ऋषिकेश पगारे, मालखेडचे सरपंच चरणसिंग मेहर, इब्राहिमपुरचे सरपंच रामसिंग डोभाळ, नारायण पा. घोडके, रतन पा. घोडके, शिवाजीराव घोडके, भिमराव जाधव, पुरुषोत्तम सुसर, गणेश पा. गाढे, कृष्णा शेजुळ, पंडीतराव गाढे, आप्पा गाढे यांच्यासह संबधित गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close