Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

संभाजीनगर:युवासेना पश्चिम आयोजित रक्तदान शिबिरात १७० पिशव्यांचे संकलन

संभाजीनगर (ता. २०) :  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून व युवासेना प्रमुख श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने,युवासेना सचिव श्री.वरून सरदेसाई, शिवसेना सचिव श्री.सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज संभाजीनगर युवासेनेच्या माध्यमातून पश्चिम मतदार संघात रविवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १७० पिशव्या रक्त संकलन झाले. कोकणवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले. 

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते रक्तदान हे जीवनदान आहे. शक्य असेल प्रत्येक युवकांनी रक्तदान करायला हवे. आपल्या यानिर्णयामुळे एखाद्याचा जीव आपण वाचवू शकतो ही जाणीव मनात ठेवून संकटकाळात जिथे जिथे रक्तदान शिबिरे असतील तिथल्या नागरिक व युवकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करावे असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी पश्चिम युवासेनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात केले. 

या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, विस्तारक निखिल वालेकर,जिल्हायुवाधिकारी ऋषीकेश खैरे,  युवासेना उपजिल्हाधिकारी शेखर जाधव, शहरधिकारी किरण तुपे,पराग कुंडलवाल यांनी केले .रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी उप शहरधिकारी दत्ता शेलार, नंदकुमार म्हस्के, अजय चोपडे, सागर वाघचौरे, व्यंकटेश औरंगाबादकर, यश पागोरे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी विशेष उपस्थिती शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख राजू राजपूत, संजय बारवाल, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांची होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close