Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

गार डोंगराची हवा…

गार डोंगराची हवा…

बालपणी शेजारच्या गावातून एक पोतराज आमच्या गावत येत असे. सहा फुटाचा आडदांड गडी, अस्सल भारतीय रंग, मोठे कान पण चेहऱ्यावर कारुण्य किंवा उदासीचे भाव. केस मोकळे सोडलेले. हातात चाबूक. रंगीबेरंगी पोशाख. तो दारोदार जाऊन देवीचे गाणी म्हणत असे आणि त्या बदल्यात जे काही मिळत असे ते घेऊन निघून जात असे.

आता या घटनेला बरीच वर्षे झाली, तरी तो पोतराज मला नेहमी आठवतो. कधी तो बाजारात टोपले आणि केरसुन्या विकत असे. कधी बाजारात आपली झोळी पसरून काहीतरी मागत असे.

तो गावात आलं की समरसून देवाची गाणी म्हणत असे. त्यातलं गार डोंगराची हवा… हे माझं आवडत गीत. त्याचा अर्थ उमगत नसे. पण ते कमालीच सुंदर वाटे. पोतराज त्याला अगदी मनापासून गाई. त्यात भक्ती आणि प्रेम ओतत असे. गोल रिंगण घालून देवीचा आर्जव करीत असे. ते गीत मला अजूनही आवडते. काही गोष्टी आपल्या अंतर्मनात रुतून बसलेल्या असतात. आपली आवड आणि समज यांच्या विपरीत असणाऱ्या अनेक गोष्टींच्या आपण प्रेमात असतो.

आता तो पोतराज कुठे असेल, माहीत नाही. देवीचं गाणं तो अजूनही गात असेल काय, सांगता येत नाही. देवीने त्या आपल्या गरीब आणि केविलवाण्या भक्ताला कृपा आशीर्वाद दिला असेल की नाही, सांगता येणार नाही. देवीचा उद्धार करणाऱ्याला ती याचकाच्या भूमिकेत का ठेवते? त्याच्या वाट्याला समृद्धी का येत नाही.

बऱ्याचदा शिवाजी जगदाळे यांच्या अंगणात टेपवर हे गाणे वाजत असे. तेव्हा टेपची फॅशन होती. मस्त आडवे उभे टेप असत. मोठ्या साइजचे बॉक्स असत. शिवाजी मामा आपले कुंभारकाम करताना नेहमी टेप लावत असे. अनेकदा लिंबाच्या झाडाला भोंगा बांधून गाणी वाजत. गावाच्या अगदी त्या टोकाला गाणी ऐकू येत असत.

पावा घोंगडी घेऊन जाई… ही गवळण किंवा चिल्या बाळाची कथा… तुम्हाला आवडो अथवा नाआवडो सतत ऐकू येऊ. मग अचानक आपण त्या संगीताशी जोडले जात असू. मग ते आवाज परिचित होत. आत्मीय वाटत. आत रुतून बसत.

गार डोंगराची हवा… हे गीत गाणाऱ्या गायक छगन चौगुले यांचं निधन झाल्याच आताच समजलं. आणि या सगळ्या आठवणी वरती उसळी मारून आल्या. काही माणसे न भेटता ही आत्मीय वाटतात. काही लोकांसाठी आपल्या मनात सद्भावना असतात. छगन चौगले यांचा आवाज असाच भूतकाळात येऊन जाणारा होता. पुन्हा बालपण जगायला लावणारा होता. त्यांना सदगती लाभो ही प्रार्थना.

आमच्या गावाकडचा पोतराज असो किंवा छगन चौगुले किंवा साखराबाई टेकाळे देवी त्यांना सन्मानचे जगणे आणि समाधानचे मरणे बहाल करो.

आमेन.—-

  • अरुण सीताराम तीनगोटे
  • 919764844621
  • प्रतिक्रीया कळवा ,
  • आपण पण ,आपल्या ,मनतले या व्यासपीठ वर ,लिहु शकताता
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close