Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सोयगावसह सहा गावांना आचारसंहिता शिथिल…निवडणुका नसल्याने प्रशासनाचा निर्णय…..


सोयगाव / विजय पगारे

  सोयगाव तालुक्यात मुदत संपलेल्या चाळीस ग्रामपंचायातींसाठी मतदान होत असल्याने निवडणूक आयोगाने शुक्रवारी आचारसंहिता लागू केली असून सोयगाव तालुक्यात निवडणुका नसलेल्या सहा गावे आणि सोयगाव शहर या सात गावांना आचारसंहितेचा बडगा राहणार नाही.
    सोयगाव नगरपंचायत क्षेत्रात आहे.नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप घोषित नाही त्याचबरोबर सोयगाव तालुक्यात माळेगाव-पिंपरी,कंकराळा,वाडी-सुतांडा,सावरखेडा-लेनापूर आणि वनगाव-घोरकुंड या सहा गावांना ग्रामपंचायतींच्या निवडणुका नसल्याने सोयगावसह या सात गावांना आचारसंहितेच्या कचाट्यातून वगळण्यात आले असून या सात गावांच्या विकास कामांना आचारसंहितेचा खोडा राहणार नाही.मात्र ग्रामपंचायत निवडणुका होवू घातलेल्या चाळीस ग्रामपंचायतींच्या हद्दीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचना निवडणूक आयोगाकडून मिळाल्या असून त्यासाठी सोमवारी सोयगाव तहसील कार्यालयात विभागांची आचारसंहिता बाबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली आहे.सोयगाव तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतींचा कार्यक्रम घोषित झाला आहे.त्यामुळे राजकीय कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले असून सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या अवघ्या तीनच दिवसात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केल्याने राजकीय पुढाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.त्यामुळे ऐन थंडीत सोयगाव तालुका तापला आहे.
————–ग्रामीण भागात राजकीय भूकंप—
  ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने सोयगाव तालुक्यात ग्रामीण भागात फिल्डिंग लावण्यासाठी राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याने ग्रामीण भागात मोठे राजकीय भूकंप ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close