Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती

कोविड लसीकरणासाठी राज्याचे स्वतंत्र ॲप व्हावे याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी कालच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली होती विनंती

अलिबाग,जि.रायगड,दि.8:- कोविड लसीकरणासाठी जिल्ह्यानिहाय पात्र व्यक्तींची नोंदणी करून स्थानिक लसीकरण केंद्र वाटपासाठी राज्य शासनाच्या स्तरावर स्वतंत्र ॲप तयार करुन मोठया प्रमाणात स्थानिक पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देणेबाबत उपाययोजना करण्याची मागणी पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री ना. श्री.अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. श्री.राजेश टोपे यांच्याकडे केली होती.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची अभ्यासू वृत्ती, विषय समजून घेण्याची हातोटी आणि प्रत्यक्ष जनतेशी असलेल्या संबंधातून मिळालेला क्षेत्रीय कामाचा अनुभव या आधारे त्यांनी केलेल्या विनंतीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोविड उपाययोजनांबाबत पत्रही लिहिले असून या पत्रात त्यांनी वय वर्ष 18 ते 44 या वयोगटाच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र ॲप बनविण्याची मान्यता देण्यात यावी, ही मागणीही केली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये “कोविड-१९” बाबत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना “को-विन ॲप” मध्ये ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर लसीकरणाची कार्यवाही करण्यात येत आहे. राज्य शासन या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी “कोविशिल्ड” व “कोवॅक्सिन” या लसींची खरेदी करुन पुरवठा करीत आहे.
“को-विन-ॲप” द्वारे १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणामध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींना लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाची ठिकाणे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील / परराज्यातील नोंदणी केलेल्या व्यक्तींना रायगड जिल्ह्यातील लसीकरणाची ठिकाणे वाटप झाली आहेत व त्याप्रमाणे लसीकरण होत आहे. त्यामुळे स्थानिक पात्र व्यक्तींना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे.
या परिस्थितीचा अभ्यास करून व दूरदृष्टी ठेवून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी कालच मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार व सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे यांना पत्र लिहून अवगत केले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close