Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

पक्षवाढीसाठी राज ठाकरे यांना चंद्रकांतदादांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे. त्यामुळे आपली ताकद दिसून येते, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा सल्ला दिला. महापालिका निवडणुकीत मनसेचा किती परिणाम होऊ शकतो, हे सांगता येईल. पण ग्रामीण भागात ग्रामपंचाययत निवडणुकीत त्यांचा किती परिणाम होईल हे सांगू शकत नाही, असं सांगतानाच राज ठाकरे यांना माझी एक सूचना राहील. त्यांनी पक्षवाढीसाठी फिरलं पाहिजे. फिरल्याने आणि प्रत्येक निवडणूक लढवल्यामुळे आपल्याला किती जनाधार मिळतो हे कळतं, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेबरोबरच्या युतीची शक्यता फेटाळून लावली. मनसेबरोबर आम्ही युती करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढणार

ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात काल भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात आल्या. तसेच काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे, असं पाटील म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close