Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

ब्रेकिंग : – जालन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला, गोलापांगरीत अंगणवाडी सेविका कोरोना पॉझिटिव्

mh20live Network

जालना:परतूर तालुक्यातील मापेगाव येथील 45 वर्षीय मयत व्यक्तीचा अहवाल आज रविवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून कोरोनाचा जालना जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे. याशिवाय जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील एका अंगणवाडी सेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. मापेगाव येथील रुग्ण हा शुक्रवारी दुपारी न्यूमोनिया आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. चिंताजनक प्रकृतीमुळे कल शनिवारी पहाटे दोन वाजता सदर रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या मयत रुग्णाच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयाने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या बाबतचा अहवाल आज रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून  मापेगाव येथील रुग्णाच्या मृत्यूमुळे जालना जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. जिल्हा प्रशासन,जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि सरकारी यंत्रणेच्या प्रयत्नानंतरही कोरोनामुळे एक बळी गेल्यामुळे जिल्ह्यातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close