Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

एसबीआय कार्ड व बीपीसीएलतर्फे बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन सादर

एसबीआय कार्ड व बीपीसीएलतर्फे बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन सादर

औरंगाबाद भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले क्रेडिट कार्ड कंपनी एसबीआय कार्ड आणि महारत्‍न कंपनी ठरलेली भारतातील दुसरी सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.ने आज बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेनच्‍या सादरीकरणाची घोषणा केली. हे कार्ड इंधनावर लक्षणीय रक्‍कम खर्च करणा-या उत्तम ग्राहक विभागाला अधिक बचत देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन बीपीसीएल इंधन व मॅक ल्‍युब्रिकण्‍ट्स खर्च, भारत गॅस (एलपीजी) खर्च (फक्‍त वेबसाइट व अॅप) आणि बीपीसीएलच्‍या इन अॅण्‍ड आऊट कन्‍वीनियन्‍स स्‍टोअर खर्च या खर्चांवर २५ पट रिवॉर्ड पॉइण्‍ट्स (आरपी) देते.

बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन ऑफर बीपीसीएल इंधन स्‍टेशन्‍सवरील इंधन व ल्‍युब्रिकण्‍ट खर्चांवर प्रचंड ७.२५ टक्‍क्‍यांची व्‍हॅल्‍यू बॅक (१ टक्‍के अधिभार सूटसह) आणि भारत गॅस खर्चांवर (फक्‍त वेबसाइट व अॅप) अद्वितीय ६.२५ टक्‍क्‍यांची व्‍हॅल्‍यू बॅक देते. तसेच या ऑफरमध्‍ये डिपार्टमेण्‍टल स्‍टोअर व ग्रोसरी, डायनिंग व चित्रपट अशा विभागांमधील इतर नियमित खर्चांवर उत्तम बचतींचा देखील समावेश आहे. बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन ग्राहकांना बीपीसीएलच्‍या व्‍यापक नेटवर्कमधून लाभ मिळेल. त्‍यांना देशभरातील १७००० हून अधिक भारत पेट्रोलियम इंधन स्‍टेशन्‍समध्‍ये इंधन व ल्‍युब्रिकण्‍ट्सवर बचतींचा आनंद घेता येईल. तसेच, इंधन खर्चांसाठी कोणत्‍याही किमान व्‍यवहाराची मर्यादा नाही. ज्‍यामुळे ग्राहकांना प्रत्‍येक व्‍यवहारावर बचत करता येईल. एकूण बीपीसीएल इंधन स्‍टेशन्‍समध्‍ये ‘प्‍युअर फॉर शुअर’ अनुभव मिळेल.

एसबीआयचे अध्‍यक्ष श्री. दिनेश खारा आपले मत व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेनचे हे सादरीकरण एसबीआय कार्ड व बीपीसीएलच्‍या सहयोगाला चालना देते. हे कार्ड ग्राहकांना उद्योगक्षेत्रामध्‍ये इंधनावर उच्‍च बचतींची खात्री देईल. ज्‍यामुळे या कार्डला विभागामध्‍ये अधिक पसंती मिळेल. हे सादरीकरण निश्चितच भारतातील डिजिटल पेमेण्‍ट्स विकासामध्‍ये साह्य करण्‍यासोबत त्‍याला चालना देईल.” 

बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेनमध्‍ये विविध नियमित खर्च केल्‍या जाणा-या विभागांमध्‍ये व्‍हॅल्‍यू बॅकसह इंधन खर्चांवर उत्तम रिवॉर्ड पॉइण्‍ट्स मिळतात. ज्‍यामुळे कार्डधारकांच्‍या एकूण खर्चांसंदर्भातील समस्‍यांचे निराकरण होते. बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन डायनिंग, चित्रपट, ग्रोसरी व डिपार्टमेण्‍टल स्‍टोअर खर्चांवर १० पट आरपी देईल. बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन कार्डधारक पूरक स्‍थानिक विमानतळ लाऊंज उपलब्‍धता सारख्‍या विशेष लाभांचा आनंद घेऊ शकतात. कार्ड ३००,००० रूपयांच्‍या वार्षिक खर्चांवर ई-गिफ्ट वाऊचर्सच्‍या रूपात २००० रूपयांचा लाभ देते. कार्डसोबत १००,००० रूपयांचे पूरक फ्रॉड लिअॅबिलिटी कव्‍हर (फसवणूक दायित्‍व कव्‍हर) देखील येते.

नवीन को-ब्रॅण्‍ड कार्डच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना एसबीआय कार्डचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अश्विनी कुमार तिवारी म्‍हणाले, ”बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन आमचा प्रबळ को-ब्रॅण्‍डेड कार्ड पोर्टफोलिओ अधिक प्रबळ करते आणि बीपीसीएलसोबतच्‍या आमच्‍या भागीदारीला अधिक चालना देईल. हे सादरीकरण आमच्‍या ग्राहकांना उच्‍च दर्जाच्‍या मूल्‍यासह दर्जात्‍मक उत्‍पादने देण्‍याच्‍या आमच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नाचा भाग आहे. भारतभरातील भारत पेट्रोलियमच्‍या व्‍यापक नेटवर्कमध्‍ये इंधन व ल्‍युब्रिकण्‍ट्सवर बचत देण्‍यासोबत हे कार्ड डिपार्टमेण्‍टल स्‍टोअल व ग्रोसरी, चित्रपट व डायनिंग आणि भारत गॅस खर्च (फक्‍त वेबसाइटल व अॅप) अशा विभागांमधील प्रमुख खर्चासाठी व्‍यापक रिवॉर्ड पॉइण्‍ट्स देखील देईल. ज्‍यामुळे आमच्‍या ग्राहकांसाठी हे सर्वांगीण, प्रमुख कार्ड ठरेल.”

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. के. पद्माकर म्‍हणाले, ”आम्‍हाला बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन सादर करण्‍याचा खूप आनंद होत आहे. हे कार्ड आमच्‍या ग्राहकांना आमच्‍या १७,००० हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्‍ये इंधन व ल्‍युब्रिकण्‍ट्स खरेदीवर, तसेच ऑनलाइन भारत गॅस एलपीजी पेमेण्‍ट्सवर विभागातील सर्वोत्तम लाभ देते. एसबीआय कार्डसोबतचा आमचा सहयोग खात्री घेतो की, आम्‍ही नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने व ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून आमच्‍या ग्राहकांना मूल्‍य देण्‍याचा सातत्‍याने प्रयत्‍न करत राहू. बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन समाजाला डिजिटली सक्षम करण्‍याच्‍या आमच्‍या योगदानांपैकी एक आहे.”

नवीन को-ब्रॅण्‍ड कार्डच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.चे संचालक (विपणन) श्री. अरुण कृ. सिंग म्‍हणाले, ”बीपीसीएल देशातील डिजिटल क्रांतीच्‍या अग्रस्‍थानी राहिली आहे. बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेनमधून बीपीसीएलची देशभरातील सर्व ग्राहकांना इंधन सुविधा देत असताना त्‍यांच्‍या डिजिटल ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून वैविध्‍यपूर्ण व दर्जात्‍मक मूल्‍य देण्‍यासाठी असलेली दृढ कटिबद्धता दिसून येते. बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेनमध्‍ये त्‍यांचे रिटेल इंधन, भारत गॅस व ल्‍युब्रिकण्‍ट्स पोर्टफोलिओमधील मूल्‍य तत्त्वाला सक्षम करण्‍याची क्षमता आहे. ज्‍यामुळे आमच्‍या बहुमूल्‍य ग्राहकांना लाभदायी कॅशलेस फ्यूएलिंग अनुभव मिळतो.”

कार्ड नोंदणीपासूनच मूल्‍य देते, जेथे नोंदणी शुल्‍काच्‍या पेमेण्‍टवर १५०० रूपयांचे ६००० बोनस पॉइण्‍ट्स मिळतात. बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्‍टेन मागील वर्षाच्‍या २००,००० रूपये किंवा त्‍यापेक्षा अधिक वार्षिक खर्चांवर वार्षिक सदस्‍यत्व शुल्‍क परत देखील करते. व्हिसा सिग्‍नेचर व्‍यासपीठावर सादर करण्‍यात आलेले कार्ड १४९९/- रूपयांच्‍या वार्षिक सदस्‍यत्‍व शुल्‍कासह येते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close