Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

अभिनेत्रीवर टीका करताना भाजप खासदाराची जीभ घसरली, केले वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : भाजपचे खासदार सौमित्र खान यांची बंगाली अभिनेत्री सायोनी घोषवर प्रतिक्रिया देताना जीभ घसरली आहे. त्यांनी सायोनी घोषणा ‘सेक्स वर्कर’ असा उल्लेख केला आहे. एका सभेदरम्यान त्यांनी हे वादग्रस्त केले. सायनो घोषने काही दिवसांपूर्वी शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह टि्वट केले होते. त्यावर सौमित्र खान यांनी सायोनी घोषवर टीका केली.

हेही वाचा बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेत

‘सायोनी घोषसारखे काही कलाकार शिवलिंग आणि देवी सरस्वतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करततात. मी असे मानतो की देवी सरस्वती आणि शिवलिंगाचा अवमान करणारे लोकच खऱ्या अर्थाने सेक्स वर्कर्स आहेत. हे वक्तव्य करण्यासाठी माझ्यावर केसही करू शकता,’ असे वादग्रस्त वक्तव्य सौमित्र खान यांनी केले आहे.
सायोनी घोषची वादग्रस्त पोस्ट…
सायोनी घोषने भक्तांच्या भावना दुखावतील अशी पोस्ट टि्वट केली होती. टि्वट पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक महिला शिवलिंगाला कंडोम घालताना दिसत आहे. तिच्या या टि्वटनंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर तिच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या होत्या. यावर सायोनी घोष म्हणाली होती, की ही पोस्ट मला न सांगता टि्वट करण्यात आली आहे. मी स्वत: ही पोस्ट पाहिली आणि मला अत्यंत आक्षेपार्ह वाटले. परंतु हे मी केलेले नाही. हा फोटो पोस्ट झाला त्यावेळी माझे टि्वटर अकाऊंट हॅक झालेले होते. ही पोस्ट फेब्रुवारी 2015 ची आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close