Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्रराजकीय

नागपुरात भाजपला जबर धक्का, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा

नागपूर/कपील जोशी

नागपूर (Nagpur) पदवीधर निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला आहे.

अभिजित वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी ही आघाडी अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवली आणि जोरदार मुसंडी मारत भाजपच्या गडाला मोठं खिंडार पाडलं. भाजपचे संदीप जोशी यांच्या मोठ्या मताधिक्यानं पराभव केला.

1958 पासून होता भाजपचा बालेकिल्ला
नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे. येथे महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे. 1958 पासून हा गड भाजपच्या ताब्यात होत्या. केंद्र वा राज्यात कुठेही पक्षाची सत्ता नव्हती, तेव्हाही पक्षाचे उमेदवार विजयी झाले. नागपुरात भाजपचे मुख्यालय असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधिपासुन हा गड भाजपच्या ताब्यात होता. 1958 मध्ये पंडीत बच्छराज व्यास हे जनसंघाचे नेते होते. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर राव फडणवीस हे देखील येथून निवडून आले होते. केंद्रीय मंत्री गडकरीही सलग चार वेळा निवडून आले. एकदा त्यांनी सर्वाधिक विक्रम केला. ते अविरोध निवडूण आले. प्रा. अनिल सोले यांनी पदवीधर मतदार संघात विजयाची पताका कायम राखली. हे संघाचे मुख्यालय आहे. येथे पराभव होणे हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत
अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲङ सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६१, सी.ए. राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि इंजीनियर संजय नासरे ५६ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत होती. तथापि, पाचव्या फेरीमध्ये उर्वरित २१ हजार ५३ मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली.

विधान परिषद निवडणुकीत अभिजित वंजारी निवडून आले आहेत. औपचारिक घोषणा बाकी आहे. थोड्याच वेळात प्रमाणपत्र घ्यायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close