दुधड ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचा नऊपैकी आठ जागांवर विजय

औरंगाबाद : दुधड (ता.औरंगाबाद) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने नऊपैकी आठ जागांवर विजय मिळवला. भाजपने ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. भाजपचे बाबासाहेब चौधरी व काँग्रेसचे माजी सरपंच कल्याण घोडके या दोन्ही अनुभवी नेत्यांनी गावात वर्चस्व राखण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची व अटीतटीची केली होती. कल्याण घोडके यांच्या ग्रामसुधार एकता पॅनलचा एकच उमेदवार निवडून आला.
ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार व कंसात मते : गंगासागर चौधरी (394), ताराबाई घोडके (348), मधुकर बोरडे (259), बळीराम बोरडे (330), जनाबाई चौधरी (296), वंदना काकडे (255), सुदाम घोडके (260), लिलाबाई अहिरे (277) विजयी झाले. ग्रामसुधार एकता पॅनलच्या एकमेव उमेदवार जिजाबाई अहिरे (270) विजयी झाल्या. सरपंचपदाच्या दावेदार असलेल्या नवख्या उमेदवार गंगासागर चौधरी यांनी 200 मतांंची आघाडी घेऊन सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा बहुमान मिळवला.