Subscribe to our Newsletter
Loading
सामाजीक/विचार/सुविचार

भोकरदन :जयेश प्रशाद यांचा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा



भोकरदन /सुरेश गिराम.
भोकरदन दि प्रतिनिधी — येथील दिवंगत नगरसेवक स्व. जयेश प्रशाद थारेवाल यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जयेश भैया मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून जयेश प्रशाद यांचा पुण्यस्मरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रशाद यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून भिवपुर येथील शहीद जवान गणेश गावंडे यांनाही यानिमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवंगत नगरसेवक जयेश प्रशाद थारेवाल यांच्या मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून सकाळी आठ वाजेला सर्वप्रथम स्व. जयेश थारेवाल यांच्यासह शहीद जवान गणेश गावंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. आज गुरुवार रोजी सकाळी दहा वाजेला येथील नगर परिषद कार्यालयासमोर गरिबांना ब्लांकेट्स वाटप करून जेवण देण्यात आले तर त्यानंतर अकरा वाजेला शहरातील शिवाजीनगर, नंदूबाई नगर, समता नगर, जिजाऊ नगर या भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सिल्लोड रोडवरील जगन्नाथ प्लाझा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून नेत्र तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी 105 रक्तदात्यांनी याठिकाणी रक्तदान केले तर नेत्र तपासणी दरम्यान या शिबिरामध्ये 475 जणांची नेत्रतपासणी करून येत्या 6 जानेवारी रोजी जवळपास 48 जणांची संभाजीनगर येथे नेत्रशस्त्रक्रिया पार पडणार आहे. अशाप्रकारे दिवंगत नगरसेवक जयेश थारेवाल यांचा पुण्यस्मरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष श्रीमती मंजुषाताई देशमुख काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, भाजपा नेते मुकेश चीने, शहराध्यक्ष सतीश रोकडे, एल के दळवे, शेषराव तळेकर, मनीष श्रीवास्तव, महेश पुरोहित, मोहन हीवरकर, महादूसिंग डोभाळ, हुकूमसिंग चुडावत , रावसाहेब ढवळे, पंढरीनाथ खरात, किरण देशपांडे, राजू जोशी, शब्बीर कुरेशी, शफीक पठाण, शेख नजीर, अनिल देशपांडे, डॉक्टर राजपूत, डॉक्टर जैन यांच्यासह पत्रकार सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन कृष्णा वाघ व रवी सासनकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयेश भैया मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close