Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

भारत – चीन वाद : पंतप्रधान मोदींना शरद पवारांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला ! वाचा सविस्तर

नवी दिल्ली/mh20liveटीम

भारत आणि चीनी सैनिकादरम्यान १५ जूनच्या रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात तुफान चकमक उडाली. ज्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. मात्र, यावेळी चीनचे देखील ४३ सैनिक ठार झाले. गेल्या अनेक दिवसांपासून चीनी सैनिक भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरुन गेले काही दिवस प्रत्यक्ष सीमारेषेजवळ बराच तणाव सुरु आहे.दरम्यान चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित होते.या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या बैठकीत विरोधकांनी आपण सरकारसोबत असून, चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन दिलं काही घटनांचा अपवाद वगळता दोन्ही देशांनी शांतता करारच्या अटींचा आदर राखला आहे. सीमाप्रश्नांशी संबंधित असलेल्या माझ्या भूतकाळातील अनुभवाच्या आधारे आणि उपलब्ध माहितीसह मी माझे विचार बैठकीत मांडले.गेल्या तीन दशकांत, चीनने आपल्या सशस्त्र सैन्याने 4 हजार किमी एलएसीवर (वास्तविक नियंत्रण रेखा) शांतपणे आपले स्थान मजबूत केले आहे. त्यांनी विशेषत: पूर्व लडाख क्षेत्रातील विस्तार आणि बळकटीवर लक्ष केंद्रित केले आहे.

चीनने सीमारेषाला मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. चीनने 4 हजार किलोमीटरमध्ये अनेक साधने जमा केली आहेत. त्यामुळे भविष्यातही चीन अशाप्रकारचं कृत्य करु शकतो, ही गोष्ट नाकारता येत नाही.डब्रुकलापासून डीबीओला जोडणारा रस्ता संपूर्णपणे नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूला आहे. भारतासाठी हा रोड महत्त्वपूर्ण आहे, कारण डीबीओला चांगला प्रगत लँडिंग ग्राउंड आहे.

या भागात आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी हवाई दलाला एक चांगलं एअरफील्ड उपलब्ध आहे.काराकोरम डोंगररांगा आणि डावीकडे सियाचिन ग्लेशियरला जोडल्याने डीबीओ देखील महत्त्वपूर्ण आहे.

चिनी सैन्याने लडाख सीमेवर भारतीय सैन्याने तयार केलेल्या डब्रुक-डीबीओ रोडवर वर्चस्व गाजवण्यासाठी गलवान खोऱ्याच्या मैदानी भागात घुसखोरी केली आहे.

चिनी सैन्य कोणत्याही वेळी हा रस्ता बंद करण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेऊ शकते. या रस्त्यासाठी भारतीय लष्कराने प्रचंड पैसे खर्च केले आहेत.

चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्याच्या उंच भूभागावर कब्जा केला आहे. त्यांनी हा परिसर रिकामा करणं आवश्यक आहे. यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. सीमेवर ताणतणाव कमी करण्यासाठी आणि चीनची समजूत काढण्यासाठी राजकीय रणनिती आखणं जरुरीचं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close