Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

या अभूतपूर्व काळात अस्थमाबद्दल असलेल्या गैरसमजांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येत आहे

औरंगाबाद:- सध्या या अभूतपूर्व काळातअशी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्याची कोणी कल्पना देखील नसेल केली, आणि आज या महामारीमुळे फुफ्फुसांच्या आजारांच्या संख्येमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे आणि या परिस्थितीमुळे लोकांमध्ये फुफ्फुसांचे आरोग्य व आजारासंबंधी अनेक गैरसमज देखील निर्माण होत आहे. द ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या अहवालानुसार भारतात सुमारे ९३ दशलक्ष लोक गंभीर प्रकारच्या श्वसन आजाराने ग्रस्त आहे ज्यापैकी ३७ दशलक्ष लोकांना अस्थमा आहे. ग्लोबल अस्थमा बर्डन मध्ये भारताचे फक्त ११.१% इतकेच योगदान आहे,तथापि संपूर्ण जगातून भारतात सुमारे ४२% लोकांचा अस्थमामुळे मृत्यू होतो ज्यामुळे भारताला अस्थमाची राजधानी म्हणून देखील ओळखले जाऊ लागले आहे.अस्थमाबद्दल बोलतांना डॉ व्यंकटेश देशपांडे,पल्मोनोलॉजिस्ट हेडगेवार हॉस्पिटल, औरंगाबाद म्हणाले की, अस्थमा हा गंभीर स्वरूपाचा श्वसन विकार आहे ज्यामध्ये ज्यामध्ये फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहचविणाऱ्या वायुमार्गात सूज येते. ज्यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारा वायुमार्ग अरुंद होतो आणि विविध प्रकारच्या ऍलर्जिक वस्तू किंवा पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे फुफ्फुसांचे आजार होण्याची शक्यता असते जे अस्थमा अटॅकसाठी प्रमुख कारक म्हणून काम करतात. इन्हेलर्सचे महत्त्व सांगताना, डॉ श्रीयश बर्दापूरकर, पल्मोनोलॉजिस्ट, श्री नर्सिंग होम,औरंगाबाद, म्हणाले की, अस्थमाच्या तीव्र स्वरूपामुळे, अस्थमाचा दीर्घकाळापर्यंत उपचार करणे आवश्यक असते, आणि अस्थमाने ग्रस्त असलेल्या रुग्नांना उत्तम व निरोगी जीवन जगण्यासाठी इन्हेलर्स महत्वपूर्ण भूमिका बजावतात. अनेक रुग्ण वारंवार औषधांचा वापर कमी करतात किंवा चुकीच्या पद्धतीने इन्हेलर्सचा वापर करतात ज्यामुळे कधी-कधी उपचार देखील थांबवावा लागतो व ज्यामुळे रुग्ण उत्तम व निरोगी जीवन जगू शकण्यास सक्षम नसतात. इन्हेलर्सचा वापर करण्यासाठी तसेच अस्थमाच्या व्यवस्थापनासाठी रुग्णांना त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते, तसेच रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार थांबवायला हवा.

डॉक्टरांनी त्यांच्या दैनंदिन अभ्यासामध्ये अस्थमाबद्दल आढळलेल्या गैरसमाजाबद्दल एक यादी तयार केली आहे आणि जागतिक अस्थमा दिवसाच्या अनुषंगाने एकत्रितपणे अस्थमा आणि इन्हेलर्सबद्दल जागरूकता निर्माण करून लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचे महत्व देखील सांगितले आहे.

या बातम्यांबद्दल अधिक वाचा-

जालना जिल्ह्यात 828 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्

जालना जिल्हयातील विविध उद्योग संधी बाबत ११ मे रोजी मोफत वेबीनार

आरक्षणाबाबत राज्य सरकारने ठोस कार्यक्रम जाहीर करावा : विनोद पाटील

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close