Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद :परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू


          औरंगाबाद:  डीएलएड परीक्षा 29 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 1 (24 व 26 जानेवारी वगळून) वाजेपर्यंत औरंगाबाद शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदलाल धुत हॉस्पीटल समोर, एन-2 सिडको, मॉडल हायस्कुल नवखंडा ज्युबली पार्क, पब्लिक हायस्कुल व पटेल कनिष्ठ महाविद्यालय शहानगर बीड बायपास रोड सातारा परिसर, औरंगाबाद या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येत आहे.  या परीक्षा कालावधीत औरंगाबाद परीक्षा केंद्र परिरसरात कायदा व सुयथा अबाधित राखयासाठी या परीक्षा केंद्रांवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(3) अन्वये मनाई आदेश अंमलात राहतील, असे आदेश पोलिस आयुक्त  डॉ. निखील गुप्ता यांनी दिले आहेत.

परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत बाहेरील आवारात परीक्षार्थी विद्यार्थी, परीक्षेसंबंधी काम करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे खेरीज करून इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत बाहेरील आवारातील झेरॉक्स मशीन, दुकाने तसेच सार्वजनिक टेलिफोन, आयएसडी बूथ, फॅक्स केंद्र व ध्वनिक्षेपके परीक्षा काळात बंद ठेवण्यात यावीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या त्यक्ती विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close