Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

शंकरनगर येथे ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून केले डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

नरसीफाटा/ शेषेराव कंधारे
भारतिय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरीनिर्वाण दिनानीमित्त 6 डिसेंबर रोजी शंकरनगर ता.बिलोली येथे ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी सकाळी 11 वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात करुन ६४रक्तदात्यांनी रक्तदान केले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन रामतिर्थ पोलीस ठाण्याचे आर.एस. मुत्योपोड , सामाजिक कार्यकर्ते माधवदादा वाघमारे, उपपोलिस निरीक्षक घाडगे,डाॅ शिवाजी कागडे, माधवराव कंधारे,मारोतराव वडे,हणमंतराव तोडे, रिपब्लीकन सेना जिल्हा आध्यक्ष अनिल सिरसे,पप्पु सोनकांबळे,दिलीप घाटे आदी उपस्थित होती. महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भास्कर भेदेकर ,सुनिल कांबळे, नागसेन जिगळेकर, गंगाधर कांबळे,दिपक कांबळे,ब्रम्हा कांबळे,अशिफ शेख नितीन कांबळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिकांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close