Subscribe to our Newsletter
Loading
निसर्ग चक्रीवादळमहाराष्ट्र

नुकसानग्रस्त प्रत्येक नागरिकाला मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कटिबद्ध — पालकमंत्री कु.आदिती तटकरे

mh20live Network

            अलिबाग,जि.रायगड, नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.आज माणगाव तालुक्यातील माणगाव, गोरेगाव, मोर्बा, सुर्ले आदिवासीवाडी, नागाव, वडवली, पुरार, वणी, नांदवी, इंदापूर आदि नुकसानग्रस्त भागांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पाहणी करून बाधित नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडाले असून वीजपुरवठाही खंडीत झालेला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करून सर्वांना तातडीने मदत पोहचविण्याचे निर्देश प्रांताधिकारी, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत. जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत मिळेल. ज्या गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे, त्या ठिकाणी टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविले जात आहे.

              विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू असून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे आश्वासक वक्तव्य पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close