Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

लग्न आटपून ,घराकडे परताणा,अपघातात बाप लेकीचा मृत्यू , आई जखमी

नायगाव ता. / शेषेराव कंधारे


         बाचोटी येथुन लग्न आटोपून घुंगराळ्यात येताच  दुचाकीस भंगार घेऊन नांदेडला जाणा-या भरधाव ट्रक ने उडवल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर झाली असुन  जखमीला नांदेड येथील रूग्णालयात हालवण्यात आले  आहे .ही घटना दि ७ जुन रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास  घुंगराळा बस्थानकावर घडली आहे .
      नायगांव तालुक्यातील घुंगराळा येथील बालाजी शिताराम सुगावे वय (40 ), नातेवाईकाच्या लग्नासाठी पत्नी संगीता बालाजी सुगावे (वय 35), रूतुजा बालाजी सुगावे( वय 13 ), हे तीघे ही मोटारसायकल क्र एम.एच.26 ए.ए . 684 या वर बाचोटी येथील लग्न आटोपून घुंगराळा बस्थानकावर येताच नायगांव येथुन भंगार घेऊन नांदेड कडे जाणा-या ट्रंक क्र .एम.एच .26 एच .8724 याने दुचाकीस जोराची धडक दिल्याने बालाजी शिताराम सुगावे व त्यांची 13 वर्षाच्या रूतुजा बालाजी सुगावे बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे .
     भंगार घेऊन जाणारा ट्रक हा आती वेगाने जात आसल्याचे प्रथम दर्शनी लोकांनी पोलीसांना सांगीतले आहे . पन्नास किलो मीटरचा प्रवास करून आले काही झाले नाही पण शनात घरी पोहचणार गावात येताच काळाने सुगावे कुंठुबावर घाला घातला आहे . यात बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाल्याने परीसरात हाळहाळ व्यक्त होत आहे . दोन्ही मृतदेह कुंटुर पोलीसांनी उतरीय तपसणीसाठी नायगांव ग्रामीन रूग्णालयात नेण्यात आले आहे . यातील गंभीर जखमी संगीता सुगावे याना पुढील उपचारासाठी नांदेड येधे नेण्यात आले आहे .ट्रक चालकास कुंटुर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .हे वृत्त लिहीपर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुंटुर पोलीस ठाण्यात सुरू होती. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close