Subscribe to our Newsletter
Loading
यशकथा

…अन् माझ्या जीवनाला दिशा मिळाली

मी वीणा विजय जोशी (वय 19 वर्षे) माझे शिक्षण 9 वी उत्तीर्ण. आई -वडिल आजारपणामुळे वारले. कोणीही नातेवाईक सांभाळायला तयार नसल्याने जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने मी शासकीय प्रेरणा महिला वसतिगृह, बारामती येथे दाखल झाले. संस्थेत दाखल झाल्यानंतर समुपदेशनामुळे मी मानसिकरित्या खूप सक्षम झाले आहे. आत्मविश्वास वाढला. काहितरी नवीन करण्याची उमेद मिळाली. मला कुकींगची आवड असल्याने माझे आवडीचे क्षेत्र लक्षात आल्याने मी त्यामध्येच करिअर करण्याचे ठरविले. संस्थेतील अधीक्षक, परिविक्षा अधिकारी यांच्याकडून या क्षेत्रामधील संधी कळल्याने त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ऑनलाईन सेशनमार्फत हॉटेल मॅनेजमेंट कोर्सची ओळख झाली. आज रोजी मी महाबळेश्वर येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करित आहे. खूप आनंदी आणि समाधानी आहे. माझ्या जीवनाला एक दिशा मिळाली. मी आत्मनिर्भर झाले. स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

या प्रशिक्षणासाठी शासकीय यंत्रणेचा खूप मोठा हातभार मिळाल्यानं हे शक्य झाले आहे. महिला व बालविकास विभागाचे व महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार.

– वीणा विजय जोशी

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close