Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

नांदेड येथील सस्पेंड सहाय्यक पोस्ट मास्तरचा फसवणुकीचा प्रयत्न पनवेलमध्ये फसला


बनावट किसान विकास पत्र व बनावट राष्ट्रीय बचत पत्र तयार करणारी टोळी जेरबंद

भारतीय डाक विभागाची समारे ६ कोटी रुपयांची बनविली होती बनावट खाती 
विविध बँकांकडे बनावट खाती गहाण ठेवून कोट्यवधींची कर्ज काढण्याचा प्रयत्न 
पनवेलमधील एचडीएफसी बँकेत कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर गुन्ह्याची उकल 
पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत यशस्वी कारवाई करून ४ जणांना घेतले ताब्यात 

पनवेल : राज भंडारी 
शहरातील एचडीएफसी बँकेत बनावट पोस्ट खात्याच्या आधारे २ कोटींचे कर्ज काढून फसवणूक करायच्या उद्देशाने आलेल्या नांदेड येथील आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अधिक चौकशी केली असता या टोळक्याने मुंबईसह इतरही बँकांमध्ये कोट्यवधींची कर्ज प्रकरणे दाखल केली असल्याचे समोर आली तर नेरुळ येथील विश्वास नागरी पतसंस्थेतून १२ लाख रुपयांचे कर्ज उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर आरोपीपैकी मुख्य आरोपी बाबाराव गणेशराव चव्हाण (२४) हा पुर्वी भारतीय डाक विभागात नदिड येथे पोस्ट मास्तर (डाक पाल) पदावर नोकरीस होता. तेथे त्याने हेराफेरी केल्याने त्याचेवर फौजदारी कारवाई करून त्याला निलंबीत करण्यात आले होती. त्याला पोस्ट खात्याचे कामकाजाची पूर्ण माहीती असल्याने त्याने व त्याचे इतर साथीदारांसह बनावट किसान विकास पत्र व राष्टीय बचत पत्रे तयार करुन तो विविध पतसंस्था व बँकामध्ये गहाण ठेवून बदल्यात कर्ज घेवुन विविध पतसस्था व बँकांची फसवणुक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच सदर आरोपींकडून बनावट दस्तऐवज व मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. यावेळी तपासात विश्वास नागरी पत संस्था, नवरत्न हॉटेल जवळ, नेरुळ, नवीमुंबई येथे ५०,००,०००/- रुपयांची भारतीय डाक विभागची बचत पत्र गहाण ठेवन १२,००,०००/- रुपये कर्ज घेतले तसेच HDF.C. BANK माहीम, मुंबई येथे २,००,००,०००/- रुपयाची, कला नागरी सहकारी बैंक, कुला, मुबई १,००,००,०००/- रुपयाची बनावट बचत पत्र गहाण ठेवून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सारस्वत बॅक, वाशी, पूसद सहकारी बैंक पनवेल, HDFC BANK पनवेल येथे बचत पत्र गहाण ठेवुन कर्ज घेण्याचा प्रयल केला. यावेळी एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पनवेल शहर पोलीस ठाण्याची मदत घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीअंती ५,८९,१५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ३ लाख रुपये किमतीचे भारतीय डाक विभागाचे एकुण ६ बनावट किसान विकास पत्र, ०२ कोटी रुपयांचे भारतीय डाक विभागाचे एकुण १० बनावट किसान विकास पत्र, ८६ लाख ५० हजार रुपये किमतीचे भारतीय डाक विभागाचे ०२ किसान विकास पत्र व ०७ राष्ट्रीय बचत पत्र, १.६५,०००/- रू. किमतीची एक पांढ-या रंगाची वॅगनर कार, १,००,०००/- रू किमतीची काळ्या रंगाची स्विफ्ट कार, बॉण्ड पेपर, भारतीय डाक विभागाचे एकूण ७ रबरी स्टॅम्प, ७ स्टॅम्प पेपर, ०२ चेक, किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्राच्याछायांकित प्रती आणि इतर कागदपत्रे असा एकूण ५ कोटी ८९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 
यावेळी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबाराव गणेशराव चव्हाण, वय २४ वर्षे, रा मु.पो.बोलसा खुर्द, ता उमरी, जि.नांदेड, सुप्रभात मल्लमप्रसाद सिंग, वय ५० वर्षे, धंदा-व्यापार, राहणार एच ४, रूम नं १००३, बलीशिल्प सेक्टर ३६,खारघर, संजयकुमार अयोध्या प्रसाद, वय ४६ वर्षे. धंदा-नोकरी, राहाणार ए ७०२, साईक्रिस्टल प्लॉट नं ४५, सेक्टर ३५ डी, खारघर आणि दिनेश रंगनाथ उपाडे, वय ३९ वर्ष, धंदा कॉन्ट्रॅक्टर,रा. रुम नं. ४९. सिंधी कॅम्प, इंदिरानगर, चेबर मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात भा.दंड.वि.कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१.३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आली आहे. सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे व पोलीस उप निरीक्षक सुनिल तारमळे, पोहवा विजय आयरे,अमोल वाघमारे, पो.ना चेतन पाटील, प्रविण पाटील, विवेक पारासुर, परेश म्हात्रे, पंकज पवार, विनोद पाटील, गणेश चौधरी, पोशि महेद्रकुमार धनगर, युवराज राउत, सुनिल गर्दनमारे, यादवराव घुले, खेडकर, साळुखे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे करीत आहेत. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close