Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे


औरंगाबाद, MH20LIVE NETWORK

मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले. तसेच या पावसामुळे झालेल्या विमा उतरवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी कळवण्याचे आवाहनही श्री. भुसे यांनी केले.
कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी श्री. भुसे यांनी केली. त्यांच्यासमवेत आमदार उदयसिंह राजपूत, कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार आदींची उपस्थिती होती. नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद श्री.भुसे यांनी साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close