सृष्टी ऍग्रो टुरिझम “उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र” म्हणुन सन्मानित
औरंगाबाद – जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे “सृष्टी ऍग्रो टुरिझम केंद्र,औरंगाबादला” उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र म्हणुन सन्मानित करण्यात आले. यावेळी संचालिका प्रतिभा किरण सानप यांना पर्यटन संचालनालयाचे सह संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या हस्ते आज मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. तसेच कृषी पर्यटन संस्थेचे प्रमुख श्री. पांडुरंग तावरे साहेब उपस्थित होते. सृष्टी ऍग्रो टुरिझम उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र म्हणुन सन्मानित करण्यात आल्याने सर्व क्षेत्रातुन अभिनंदन केले जात आहे.