Subscribe to our Newsletter
Loading
निसर्ग चक्रीवादळशेतीविषयक

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पेण मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

mh20live.com

अलिबाग, जि.रायगड,दि.10 — निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या,सुपारीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रातील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आलेल्या कृषी मंत्री श्री.दादाजी भुसे यांनी पेण तालुक्यातील मौजे जिते येथील शेतकरी श्री. काशिनाथ चांगू म्हात्रे यांच्या नुकसानग्रस्त आंबा बागेची पाहणी केली.
या पाहणीवेळी श्री.काशिनाथ म्हात्रे यांच्या एकूण 0.43 हे.क्षेत्रापैकी बागेतील 17 आंब्याची झाडे व नारळाची 8 झाडे मुळासकट उन्मळून पडली असल्याचे निदर्शनास आले.
या सर्व नुकसानीची पाहणी कृषी मंत्री महोदयांनी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वनही केले. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासन लवकरच योग्य तो निर्णय घेईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक श्री. विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री पांडुरंग शेळके, तालुका कृषी अधिकारी श्री.अनिल रोकडे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक,जिते गावच्या सरपंच अंजना विलास म्हात्रे ,शेतकरी काशीनाथ चांगू म्हात्रे ,दिलीप मधुकर म्हात्रे, चिंतामण शंभाे म्हात्रे आदी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close