Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

आर्मी सोडल्यानंतर बॉलीवुड मध्ये आपला जलवा दाखवत आहे ही अभिनेत्री !

MH20LIVE

सैन्यदलातील सेवेत रुजू होण्याची अनेकांचीच इच्छा असते. कित्येकांना ही संधी मिळतेही. अशीच सुवर्णसंधी अभिनेत्री माही गिल हिलाही मिळाली होती. ‘साहेब बिवी और गँगस्टर ३’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणाऱ्या माहीनेच याविषयीचा खुलासा केला

बॉलिवूडची दुनिया ही खूप वेगळी आहे, इथली एक खास गोष्ट अशी आहे की इथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला निश्चितच त्यांचे स्वप्न मिळवण्याचे किव्हा जगण्याची संधी मिळते. आज आपण बॉलीवूडच्या अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत.

तिने असा विचार कधीच केला नव्हता की ती थेट सैन्याच्या नोकरीतून बॉलिवूड जगतात जाईल. या अभिनेत्रीचे म्हणणे आहे की तिला कधीही बॉलिवूडमध्ये यायचे नव्हते, परंतु काळाने तिला आज बॉलिवूडमधील सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक केले आहे.

माही गिल यांचा जन्म 1975 मध्ये चंडीगडच्या एका कुटुंबात झाला. त्यांचे वडील शासकीय अधिकारी आणि आई महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. माही शालेय शिक्षणादरम्यान एनसीसीमध्ये दाखल झाली आणि तिला सैन्यातही नोकरी मिळाली. सैन्याच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यासोबत एक दुर्घटना घडली आणि त्यामुळे सैन्याचे स्वप्न हे तसेच राहिले.

होय, पेरासीलिंग दरम्यान फ्री-फोल मुळे ती मृ- त्यूपासून वाचल्याचं तिचं म्हणणं आहे. या कारणास्तव तिच्या घरातील लोकांनी तिला परत घरी बोलावले. माही म्हणते की ती कधीही चित्रपटात येईल असा विचार तिने केला नव्हता, परंतु तिची कमांड आणि बोलण्याची पद्धत उत्कृष्ट होती, म्हणूनच तिला एकावेळी चित्रपट दिग्दर्शकाची भेट झाली.

त्याने तिला चित्रपटाची ऑफर दिली आणि मी फक्त त्याच्या सांगण्यावरूनच अभिनय करण्यास सुरवात केली, हळूहळू बर्‍याच पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. यामुळेच माही गिल यांना चित्रपट जगतात एक ओळख मिळाली.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close