Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं

mh20live Network

मुंबई | सुशात सिंह राजपूतने आतापर्यंत अनेक टीव्ही सिरिअल आणि चित्रपटात काम केले आहे. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल ‘किस देश मे हा मेरा दिल’ मधून झाली. यानंतर त्याला खरी लोकप्रियता दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. एम एस धोनी चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणाऱ्या सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्र्याच्या घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती मिळते आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या घरी कामाला असलेल्या नोकराने ही माहिती दिली आहे. सुशांत सिंग यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमकं कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आलं होतं का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत. सुशांतने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने बॉलिवूड हादरुन गेलं आहे.

टीव्ही सिरिअल ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

‘काय पो छे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका निभावली. या चित्रपटातील त्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात वाणी कपूर आणि परिणीती चोप्राोसबत त्याने काम केलं . यानंतर ‘केदारनाथ’, ‘पीके’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही त्याने काम केलं.

सुशात सिंह राजपूतने आतापर्यंत टीव्ही सिरिअल आणि चित्रपटात काम केले आहे. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल किस देश मे हा मेरा दिल मधून झाली आहे. यानंतर खरी ओळख त्याला दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल पवित्र रिश्तामधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close