Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी

राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी

पुनर्स्थापित होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुर्ण क्षमतेने क्षेत्र सिंचनाखाली येणार

            मुंबई, दि. 21 : राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी १६८ कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असल्याने प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढुन पुर्ण संकल्पित क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

दुरुस्ती कामांचे GEOTAG व व्हिडीओ चित्रिकरण

            श्री.गडाख म्हणाले,कामाची गुणवत्ता उत्तर दर्जाची राहील याची जबाबदारी जलसंधारण अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येक कामांची उलट तपासणी करण्यात येणार आहे. दुरुस्ती कामाचा दोष दायित्व कालावधी ५ वर्षोचा राहणार आहे. प्रत्येक कामांचे GEOTAG व व्हिडीओ चित्रिकरण बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री गडाख यांनी माहिती देतांना सांगितले की, राज्यातील विविध विभागातील ० ते  १००हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या ८०२ प्रकल्प आणि १०० ते २५० हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेले ६० प्रकल्पांच्या दुरुस्ती अनेक वर्षांपासून प्रलंबित होते.त्यामुळे प्रकल्पातील पाणी वाया जात होते. शेतकऱ्यांना प्रकल्प आपल्या परिसरात असूनही त्याचा लाभ होत नव्हता. शेतकऱ्यांना त्या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात येणार आहे.

            या दुरुस्तीमध्ये ० ते  १०० हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या कामात अमरावती विभागातील २०२ कामांना ५७.२३ कोटी, औरंगाबाद २२७ कामांना ३४.४० कोटी,ठाणे २ कामांना १८ लाख,नागपूर ९३ कामांना १४.७८ कोटी,नाशिक १२० कामांना ३१.६२ कोटी,पुणे १५८ कामांना ६४ लाख मंजूरी देण्यात आली आहे. तर १०० ते २५०  हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या ठाणे विभागातील २ कामांना ६.२२ कोटी,नाशिक ७ कामांना ४.५९ कोटी, पुणे २५ कामांना ११.२२ कोटी,अमरावती १८ कामांना ३.९७ कोटी,औरंगाबाद ४ कामांना १.११कोटी आणि नागपूर ४ कामांना १.७० कोटी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी  दिली.

प्रकल्पांची साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार

            दुरुस्ती करण्यात येणाऱ्या योजनांची कार्यकारी अभियंता धरण सुरक्षितता संघटना यांनी पाहणी केलेली असून पाहणीनुसार दिलेल्या निरिक्षण टिपणीनुसार प्रादेशिक जलसंधारण अधिकारी तथा अधीक्षक अभियंता,  यांनी दिलेल्या प्रमाणपत्रा नुसार प्रकल्पांच्या खालील बाजूस उतारावर  पाण्याची गळती असल्याने तसेच विमोचकाचे बांधकाम  दगडी असून त्यामुळे प्रकल्पांना धोका संभवू शकतो असे निरिक्षण नोंदविलेले आहे. सदर दुरुस्तीची कामे केल्यानंतर प्रकल्पांची साठवण क्षमता पुर्नस्थापित होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत  पुर्ण क्षमतेने क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील विविध योजनांची नावे आणि दुरुस्तीच्या कामांना दिलेल्या प्रशासकीय मंजूरीची रक्कम

            सिंचन तलाव कारंजा ब (बहीरमघाट) ता.चांदुर बाजार, जि.अमरावती येथील दुरुस्ती कामासाठी 83 लाख 64 हजार 500 रुपयांची प्रशासकीय मान्यता, सिंचन तलाव मोजरी, ता.चांदुर बाजार, जि.अमरावती-85 लाख 21 हजार 900 रुपये, दगडी बंधारा, तांदुळवाडी ता.सटाणा, जि. नाशिक-71 लाख 99 हजार 499 रुपये, लघु पाटबंधारे, अलंगुण, ता.सुरगाणा, जि.नाशिक-2 कोटी 99 लाख 30 हजार 661 रुपये, सिंचन तलाव विश्रोळी, ता.चांदुर बाजार, जि.अमरावती-2 कोटी 15 लाख 53 हजार 900 रुपये, लघु पाटबंधारे योजना, परुळे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी-3 कोटी 2 लाख 68 हजार 982 रुपये, पेशवे लघु पाटबंधारे तलाव, जेजुरी, ता.पुरंदर, जि.पुणे-2 कोटी 90 लाख 39 हजार 516 रुपये, लघु पाटबंधारे तलाव, अहिल्याबाई होळकर, जेजुरी, ता.पुरंदर, जि.पुणे-1 कोटी 13 लाख 32 हजार 60 रुपये, पुणे प्रादेशिक जलसंधारण विभागातील एकूण 178 दुरुस्ती योजनांसाठी 23 कोटी 39 लाख रुपये, लघु पाटबंधारे तलाव, मलतवाडी, ता.चंदगड, जि.कोल्हापूर-1 कोटी 19 लाख 17 हजार 972 रुपये, लघु पाटबंधारे योजना, राजेवाडी, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी-3 कोटी 19 लाख 31 हजार 539 रुपये, लघु पाटबंधारे तलाव, घाटकरवाडी, ता.आजरा, जि.कोल्हापूर-2 कोटी 37 लाख 35 हजार 379 लघु पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, देवगाव, ता.जि.सातारा-64 लाख 37 हजार 965 रुपये, अमरावती प्रादेशिक जलसंधारण विभागातील एकूण 217 दुरुस्ती कामांसाठी 57 कोटी 36 लाख 17 हजार 200 रुपये, औरंगाबाद प्रादेशिक जलसंधारण विभागातील 231 दुरुस्ती कामांसाठी 35 कोटी 51 लाख 51 हजार रुपये, नाशिक विभागातील 121 दुरुस्ती कामांना 30 कोटी 2 लाख 6 हजार रुपये, ठाणे विभागातील दोन दुरुस्ती कामांना 18 लाख 12 हजार रुपये, नागपूर विभागातील दुरुस्ती कामांना 16 कोटी 48 लाख 89 हजार रुपये, लघु पाटबंधारे योजना सुकोंडी वाघवीणे, ता.दापोली, जि.रत्नागिरी-2 कोटी 45 लाख 6 हजार 790 रुपये, लघु पाटबंधारे योजना विढे, ता.मुरबाड, जि.ठाणे-1 कोटी 45 लाख 31 हजार 716 रुपये आणि लघु पाटबंधारे योजना हर्दखळे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी या दुरुस्ती कामांसाठी 2 कोटी 28 लाख 38 हजार 278 रुपये,

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close