Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

10, 12 वी चा अर्ज क्र. 17 भरण्यासाठी मुदतवाढ

10, 12 वी चा अर्ज क्र. 17 भरण्यासाठी मुदतवाढ

औरंगाबाद,: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इ. 12 वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या अर्ज क्र. 17 भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

त्यानुसार सन 2021 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस खाजगीरित्या (अर्ज क्र. 17) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे नियमित शुल्काने भरण्याबाबत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यासाठी सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे.

इ. 10 वी व इ. 12 वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या मुदतवाढीबाबतच्या नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठीच्या तारखा खालील प्रमाणे आहेत.

सोमवार दिनांक 11 ते सोमवार दिनांक 25 जानेवारी 2021 पर्यंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे, मंगळवार दिनांक 12 ते बुधवार दिनांक 27 जानेवारी पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे, मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी 2021 पर्यंत संपर्क केंद्र शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे.

खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व इ. 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी, इंग्रजीमधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी. इ. 10 वी संकेतस्थळ :- http://form17.mh-ssc.ac.in इ. 10 वी संकेतस्थळ :- http://form17.mh-hsc.ac.in विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास व्दितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाईलव्दारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (compulsory) आहे. संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करावयाची आहेत.

खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालील प्रमाणे आहे.

इ. 10 वी – रू.1000/-नोंदणी शुल्क + रू.100/- प्रक्रिया शुल्क (Processing fee)

इ. 12 वी – रू.500/-नोंदणी शुल्क + रू.100/- प्रक्रिया शुल्क (Processing fee)

          माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्याच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.

          उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्याचा पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.

          इ. 10 वी, इ. 12 वी सन 2021 खाजगी विद्यार्थी अर्ज क्र. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Benking) व्दारे भरणे अनिवार्य राहिल. ऑनलाईन पद्धतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरूस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव असल्यास विद्यार्थ्यांस पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.) दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या, प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत करून अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांचेकडून माहिती प्राप्त करून घ्यावी.

          ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207, 25705208 वर व तसेच इतर बाबींसाठी 25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (examination form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे मंडळाच्या सचिवांनी कळविले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close