Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

‘रसोडे मे कौन था’ फेम ‘राशी बेन’ आहे मराठी कुटुंबातील, जाणून घ्या तिचे खरे नाव व पहा तिचे लेटेस्ट फोटो

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

‘रसोडे मे कौन था’ फेम ‘राशी बेन’ आहे मराठी कुटुंबातील, जाणून घ्या तिचे खरे नाव व पहा तिचे लेटेस्ट फोटो !
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि तो विडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण विचारत आहे ‘रसोडे मे कौन था…, कोण था रसोडे मे ‘?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कोकिला बेन तिच्या सुनेला अर्थात गोपीला म्हणते, ‘कल मेरी साडी पर जूस गीरा था,और मे दोबारा नहाने गई थी. तुम चने कूकर में चढ़ाकर मेरे पास आई थीं, तब रसोड़े में कौन था? वहां कौन था? मैं थी? तुम थी? कौन था? कौन था? कौन था?’ यावर गोपी बहु घाबरत असे म्हणत – राशी बेन.” यावर कोकिलाबेन म्हणते, “ राशी… कुकर मेसे चने निकाल दिए और खाली कुकर गॅस पर चढा दिया.”

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री रुचा हसबनिसने हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत ‘वो मैं थी’ या मजेदार पद्धतीने उत्तर हे कॅप्शन मध्ये लिहिले आहे. या मालिकेत रुचाने राशी बहूची भूमिका साकारली होती. ही सीरियल अजूनही लोकांमध्ये खूपच आवडीची आहे. तिच्या व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. टीव्ही अभिनेत्री अदा खानने देखील यावर भाष्य केले आणि लिहिले की, “राशी बेबी यु आर ट्रेंडिंग.”

यश राज मुखाते नावाच्या गायक-संगीतकाराने ‘रसोडे मे कोण था’ यावर एक रॅप सॉंग तयार केले आहे. यशराज मुखाते यांने कोकिलाबेन, गोपी आणि राशी यांचा एक संवाद आपल्या आवाजात मिसळुन एक रॅप तयार केला आहे. यशराज मुखाते याचे हे रॅप सॉंग मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून हा मेशअपचा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर रुचा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आजकाल कुठे असते राशी

5 वर्षांपूर्वी साथ निभाना साथियाला रिचाने निरोप दिलेला आहे. 2014 मध्ये रुचाने तिच्या दीर्घ काळच्या प्रियकरसोबत लग्न जमवून या मालिकेला निरोप दिला होता. ज्यानंतर या मालिकेतल्या राशीच्या पात्राच्या निधनानंतर हे पात्र स्क्रॅप केले गेले होते. रुचाने 2015 मध्ये राहुल जगदाळेशी लग्न केले.

या टीव्ही सीरियलला निरोप घेताना रिचाने सांगितले होते की अभिनय हा तिचा छंद आहे, प्रोफेशनची निवड नाही. म्हणून आता तिला हे पुढे करण्याची इच्छा नाहीये. रुचा म्हणाली, “तिचा नशिबावर विश्वास आहे म्हणून ती परत कधीच येणार नाही असे नाही.” माझ्या परत येण्याविषयी निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.

आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा टीव्हीवर बघायचं आहे. 8 ऑगस्ट रोजी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना तिनी याबाबत माहिती दिली होती.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close